Dr. Pankaj Ashiya : लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी ११ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

Dr. Pankaj Ashiya : लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी ११ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

0
Dr. Pankaj Ashiya : लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी ११ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
Dr. Pankaj Ashiya : लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी ११ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

८०० पेक्षा कमी लिंग गुणोत्तर असलेल्या ४४ गावांसाठी विशेष कार्यशाळा

Dr. Pankaj Ashiya : नगर : जिल्ह्यातील लिंग गुणोत्तरात (Sex Ratio) वाढ झाली असली तरी ते अद्याप समाधानकारक नाही. त्यामुळे ८०० पेक्षा कमी लिंग गुणोत्तर असलेल्या ४४ गावांतील प्रतिनिधींनी ग्रामस्थांच्या सहभागातून ११ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबवून मुलींच्या जन्माविषयी समाजात सकारात्मक दृष्टीकोन (Positivity Regarding the Birth of Girls) निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी केले.

धरणांतील पिण्याचे पाणी ३० सप्टेंबरपर्यंत राखून ठेवणार; पाऊस लांबल्याने मुदत वाढविली

जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित विशेष कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी पीसीपीएनडीटी राज्य पर्यवेक्षण मंडळाच्या सदस्या डॉ. सुधा कांकरिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, निवासी वैद्यकीय अधिकारी शिवशंकर वलांडे, ॲड. सारिका सुराशे तसेच अहिल्यानगर, नेवासा, श्रीगोंदा, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, पारनेर, पाथर्डी, राहुरी, शेवगाव, अकोले, जामखेड, कर्जत आणि कोपरगाव तालुक्यांतील सरपंच, तलाठी, पोलीस पाटील, आशा व अंगणवाडी सेविका, तालुका आरोग्य अधिकारी आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, (Dr. Pankaj Ashiya)

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. ज्या गावांमध्ये लिंग गुणोत्तरात सकारात्मक बदल दिसून येईल, त्या गावांचा प्रशासनातर्फे सन्मान करण्यात येईल. पीसीपीएनडीटी राज्य पर्यवेक्षण मंडळाच्या सदस्या डॉ. सुधा कांकरिया यांनी स्त्रीभ्रूणहत्येची कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी दृकश्राव्य सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, चिमुकलीचा जीव वाचविण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. गर्भवती महिलांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतानाच गर्भरक्षणाविषयी जागृती करणे आवश्यक आहे.


आशा व अंगणवाडी सेविकांनी ‘मैत्री’ योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना आधीच मुली आहेत आणि त्या पुन्हा गर्भवती आहेत, त्यांच्याशी विश्वासाचे नाते निर्माण करावे. त्यामुळे कुटुंबात मुलगी नको या मानसिकतेतून बेकायदेशीर लिंगनिदानाचा विचार झाल्यास त्यापासून परावृत्त करणे सोपे जाईल. आई व बाळाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेले सोनोग्राफी यंत्र स्त्रीभ्रूणहत्येचे साधन ठरू नये, यासाठी जागरूक राहून कायद्याच्या अंमलबजावणीस सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी प्रास्ताविक केले. निवासी वैद्यकीय अधिकारी शिवशंकर वलांडे यांनी आभार मानले.

चिमुकलीचा जीव वाचविण्यासाठी ११ कलमी कृती आराखडा

गावातील लिंग गुणोत्तराचा अभ्यास करून त्याची माहितीफलकावर नोंद करणे, ग्रामसभेत स्त्रीजन्म स्वागताचा ठराव मंजूर करणे, गर्भवती महिलांचे नियमित आरोग्य निरीक्षण करून ‘मैत्री’ योजना राबविणे, कायद्याविषयी जनजागृती करणे, ‘कन्याजन्मानंद सोहळा’ साजरा करणे, फक्त मुली असलेल्या कुटुंबांचा सन्मान करणे, विवाह सोहळ्यांमध्ये स्त्रीजन्म स्वागताचा ‘आठवा फेरा’ घेणे, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आणि ‘जननी सुरक्षा’ यांसह विविध शासकीय योजनांचा लाभ देणे, युवकांचा सहभाग वाढविणे, ‘मुलगी परके धन नसून पणती दोन्ही घरांना उजेड देते’ हा विचार रुजविणे आणि सामूहिक शपथ घेणे या अकरा बाबींचा आराखड्यात समावेश आहे.