Best Qualities of a Good Husband : ‘लग्न’ (Wedding) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक टप्पा असतो. विशेषतः मुलींसाठी लग्न (Marriage for girls) म्हणजे एका नव्या आयुष्याची आणि नव्या नात्यांची सुरुवात असते. त्यामुळेच लग्नासाठी मुलगा निवडताना मुली आणि त्यांचे कुटुंब सहसा काय बघतात? चांगला पगार, स्वतःचं घर, खानदानी कुटुंब आणि दिसणं…पण विचार करा, या सगळ्या गोष्टी असूनही जर त्या मुलाचा स्वभावच जुळवून घेणारा नसेल तर …
असं म्हणतात जर आयुष्याचा जोडीदार चांगला असेल, तर संसाराची गाडी अगदी सुखात चालते. पण मग, समोरचा मुलगा एक उत्तम जोडीदार ठरेल की नाही, हे कसं ओळखायचं? कोणत्या प्रकारच्या स्वभावाचे पुरुष उत्तम जोडीदार (Best Qualities of a Good Husband) ठरतात आणि जोडीदार निवडताना कोणत्या गुणांना सर्वाधिक प्राधान्य द्यावे, तेच आज आपण पाहणार आहोत…
नक्की वाचा : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना केवळ १ रुपयात मिळणार सरकारी जमीन; राज्यसरकारचा मोठा निर्णय
कोणत्या प्रकारच्या स्वभावाचे पुरुष उत्तम जोडीदार? (Best Qualities of a Good Husband)
१. आदर देणारा आणि उत्तम श्रोता :- मुलगा कितीही श्रीमंत किंवा देखणा असला, आणि जर तो महिलांचा आदर करत नसेल, तर त्या नात्याला काहीच अर्थ उरत नाही. जो पुरुष केवळ तुमच्यावर प्रेमच नव्हे, तर तुमच्या विचारांचा, तुमच्या स्वप्नांचा आणि तुमच्या आवडीनिवडींचा आदर करतो, तो एक उत्तम जोडीदार होतो. लग्न ठरवताना तो तुमचे म्हणणे किती शांतपणे ऐकून घेतो, तुमच्या मताला किती महत्त्व देतो, यावरून त्याचा हा स्वभाव ओळखता येतो. स्वतःचा मोठेपणा मिरवण्यापेक्षा पत्नीच्या सुखाचा विचार करणारे पुरुष संसारात कधीही दुरावा येऊ देत नाहीत.
२. कठीण काळात खंबीरपणे साथ देणारा (Best Qualities of a Good Husband)
आयुष्यात नेहमीच चांगले दिवस राहातील असं नाही. सुख-दुःखाच्या चढ-उतारात जो पुरुष डगमगून न जाता आपल्या पत्नीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, तोच खरा जीवनसाथी! जोडीदाराची मानसिक आणि भावनिक स्थिती समजून घेण्याची प्रगल्भता ज्या पुरुषात असते, तो संसार कधीही तुटू देत नाही. लग्नाआधी छोट्या-छोट्या संकटात किंवा वादात तो परिस्थिती कशी हाताळतो, यावरून तुम्ही त्याच्या या गुणाचा अंदाज लावू शकता.
प्रत्येक नात्यात चढ-उतार आणि मतभेद येत असतात. अशावेळी रागाच्या भरात निर्णय न घेता शांत राहून परिस्थिती हाताळणारा पुरुष उत्तम जोडीदार ठरतो. संयमी स्वभावामुळे वाद वाढण्याऐवजी ते लवकर मिटतात आणि नात्यातील गोडवा टिकून राहतो.
३. अहंकार नसणारा आणि जबाबदार स्वभाव :- ज्या पुरुषांमध्ये ‘मी’पणा किंवा पुरुषी अहंकार नसतो, असे पुरुष कुटुंब खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात. सुखी संसारासाठी दोघांनाही मिळून निर्णय घ्यावे लागतात, अशावेळी स्वतःची चूक मान्य करण्याची आणि तडजोड करण्याची तयारी असणारा पुरुष उत्तम जोडीदार बनतो.
४. भावनिकदृष्ट्या परिपक्व :- भावनिकदृष्ट्या परिपक्व पुरुष प्रत्येक छोट्या गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतो. नात्यात मतभेद किंवा अडचणी आल्यास तो दोषारोप न करता शांतपणे संवाद साधून तोडगा काढण्यावर भर देतो. अशा स्वभावामुळे वैवाहिक नात्यात विश्वास, स्थैर्य आणि आपुलकी कायम राहते.
अवश्य वाचा : युवराज सिंग दिसणार कोचच्या भूमिकेत; लवकरच ‘या’ संघाची धुरा हाती घेणार
५. चांगला संवाद साधणारा :- कोणत्याही नात्याचा पाया हा संवाद असतो. आपल्या भावना, अपेक्षा आणि समस्या मनात न ठेवता जोडीदारासोबत मोकळेपणाने बोलणारा पुरुष नाते अधिक मजबूत बनवतो. गैरसमज निर्माण झाल्यास तो शांतपणे चर्चा करून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. अशा स्वभावामुळे नात्यात विश्वास, पारदर्शकता आणि जवळीक कायम राहते.
६. प्रामाणिक व समजदार :- विश्वास हा कोणत्याही नात्याचा सर्वात मजबूत आधारस्तंभ असतो आणि प्रामाणिकपणा हा विश्वास निर्माण करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो. जो पुरुष आपल्या जोडीदारापासून कोणतीही गोष्ट लपवत नाही आणि नेहमी सत्य बोलतो, त्याच्यासोबतचे नाते अधिक मजबूत बनते. प्रामाणिक व्यक्ती चुका झाल्या तरी त्यांची कबुली देते आणि नात्यात पारदर्शकता राखते. तसेच प्रत्येक व्यक्तीचे विचार, भावना आणि गरजा वेगळ्या असतात. समजूतदार पुरुष आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तिच्या दृष्टिकोनाचाही आदर करतो.
७. जबाबदारीची जाणीव :- चांगला जोडीदार हा केवळ स्वतःच्या गरजांचा विचार करत नाही, तर आपल्या पार्टनरच्या सुख-दुःखाचीही जबाबदारी स्वीकारतो. तसेच आर्थिक, कौटुंबिक आणि भावनिक जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणारा हा पुरुष नात्यात स्थैर्य निर्माण करतो. कठीण प्रसंगी तो कुटुंबासाठी खंबीरपणे उभा राहतो आणि योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो. अशा मुलाच्या जबाबदार स्वभावामुळे वैवाहिक आयुष्य अधिक सुरक्षित आणि आनंदी राहू शकते.



