FDA : पाणी बॉटलची सक्ती करणारी हॉटेल्स मुंढेंच्या रडारवर; हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या, तुकाराम मुंढेंचा आदेश

0
DA : पाणी बॉटलची सक्ती करणारी हॉटेल्स मुंढेंच्या रडारवर; हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या, तुकाराम मुंढेंचा आदेश
DA : पाणी बॉटलची सक्ती करणारी हॉटेल्स मुंढेंच्या रडारवर; हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या, तुकाराम मुंढेंचा आदेश

FDA : नगर : राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर सर्व ठिकाणी ग्राहकांना पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी हे मोफत उपलब्ध करण्यात यावं, बाटलीबंद पाणी देऊ नये, तसा बोर्ड त्यांनी समोर लावावा. जर एखाद्या ग्राहकाने या व्यतिरिक्त बाटलीबंद पाणी मागितलं तर त्याला ते द्यावं. जर याची अंमलबजावणी केली नाही तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला.

हेही वाचा : आनंदवार्ता! ४० वारकरी एकत्र आल्यास गावातूनच सुटणार ‘लालपरी’

मोफत पाणी द्या…

राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे आणि ज्या ठिकाणी अन्न प्रक्रिया केली जाते त्यांनी नियमांचे पालन करणं बंधनकारक आहे. त्याचं जर उल्लंघन केलं तर त्यांना कुणीही वाचवू शकणार नाही, असा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. तसेच हॉटेल्सनी ग्राहकांना पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी हे मोफत देणं गरजेचं आहे, तसा बोर्ड त्यांनी समोर लावावा, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

नक्की पहा : १ जुलैपासून खिशाला कात्री; रेल्वे तिकिटांपासून LPG पर्यंत बदलणार ७ नियम

अन्यथा कारवाई…(FDA)

राज्यातील नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावं यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी सर्वांनीच नियमांची अंमलबजावणी करावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल असं तुकाराम मुंढे म्हणाले.