Crime : रागाच्या भरात पेटवली मेव्हण्याची गाडी; कौटुंबिक वादातून धक्कादायक प्रकार

0
Crime : रागाच्या भरात पेटवली मेव्हण्याची गाडी; कौटुंबिक वादातून धक्कादायक प्रकार
Crime : रागाच्या भरात पेटवली मेव्हण्याची गाडी; कौटुंबिक वादातून धक्कादायक प्रकार

Crime : नगर : राहुरी तालुक्यातील प्रसादनगर परिसरात रागाच्या भरात पतीने मेव्हण्याची जुपिटर मोटरसायकल पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

हेही पहा : जिल्ह्यातील चार लाख बालकांना दिली जाणार पोलिओची लस : जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे

कौटुंबिक वाद

या घटनेतील फिर्यादी नेहा नवनाथ मोरे (वय २१) राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगरमध्ये राहते. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, घटनेच्या दिवशी तिचा भाऊ धरम तायडे आणि पती नवनाथ भाऊसाहेब मोरे यांच्यात कौटुंबिक वाद झाला होता. वादाच्या भरात पती नवनाथने मेव्हण्याला शिवीगाळ केल्याचे समजताच नेहा यांनी भावाला घरीच थांबवून घेतले होते. रात्री ११:३० च्या सुमारास नवनाथ घरी आला. त्याने जेवण आणि मोबाईल घेतले व निघून जाण्यापूर्वी पत्नी नेहा यांना मारहाण केली. यानंतर मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर असामान्य आवाज ऐकू आल्याने नेहा यांनी खिडकीतून बाहेर पाहिले. तेव्हा त्यांना पती नवनाथ भाऊसाहेब मोरे हा मेव्हण्याची घराबाहेर उभी असलेली जुपिटर मोटरसायकल पेट्रोल टाकून जाळत असल्याचे दिसले.

नक्की वाचा : फेसबुकवर ट्रॅक्टर भाड्याने घेण्याचे आमिष दाखविणारा जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

मोटारसायकल जळून खाक (Crime)

नेहा यांनी लगेच आरडाओरडा केला आणि शेजाऱ्यांना हाक मारली. शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत मोटरसायकल पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती आणि ती खाक झाली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, पण गाडीचे मोठे नुकसान झाले.या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक कलह इतका विकोपाला जाऊन मेव्हण्याची वाहन जाळण्यापर्यंत मजल गेल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.