Shrigonda : संत श्री शेख महंमद महाराज मंदिरात मोहरमनिमित्त ताजिया स्थापना

0
Shrigonda : संत श्री शेख महंमद महाराज मंदिरात मोहरमनिमित्त ताजिया स्थापना
Shrigonda : संत श्री शेख महंमद महाराज मंदिरात मोहरमनिमित्त ताजिया स्थापना

Shrigonda : नगर : मोहरम पर्वानिमित्त श्रीगोंदा शहरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या संत श्री शेख महंमद महाराज मंदिरात पारंपरिक पद्धतीने ताजिया (ताबुत) स्थापना करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे गुरु म्हणून ओळख असलेल्या सुफी संत श्री शेख महंमद महाराज यांच्या मंदिरात ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडपणे जपली जात आहे.

हेही वाचा : फेसबुकवर ट्रॅक्टर भाड्याने घेण्याचे आमिष दाखविणारा जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

धार्मिक कार्यक्रम

संत श्री शेख महंमद महाराज यांच्या वंशजांकडून ही धार्मिक परंपरा आजही श्रद्धेने पुढे चालवली जात असून, सालाबादप्रमाणे यंदाही दर्गा परिसरात पारंपरिक रुढी-परंपरेनुसार ताजियाची स्थापना करण्यात आली. मोहरम निमित्त श्रीगोंदा शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी ताजिया, सवारी आणि पंजाची स्थापना करण्यात आली आहे. शहरात जावेद फकीर, राजू मनियार, बाळासाहेब गोरे, बादशहा मालजप्ते, महंमद शेख, डॉ. बन्सीभाई मनियार आदींसह अनेक भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

नक्की पहा : जिल्ह्यातील चार लाख बालकांना दिली जाणार पोलिओची लस : जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे

महाप्रसादाचे आयोजन (Shrigonda)

उद्या (ता. २६) रोजी ताजियाचे विसर्जन करण्यात येणार असून, त्यानंतर रविवार दि. २८ जून रोजी ‘तिजायत’ निमित्त संत श्री शेख महंमद महाराज मंदिरात खिचडा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन शेख महंमद बाबा ट्रस्टचे अध्यक्ष तथा संत श्री शेख महंमद महाराज यांचे वंशज नगरसेवक आमीन शेख यांनी केले आहे.