AMC : नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या (AMC) वतीने सक्कर चौक येथील उड्डाणपुलाखालील उद्यान परिसरात विशेष स्वच्छता मोहीम (Cleanliness Drive) राबविण्यात आली. या अभियानादरम्यान उद्यानात साचलेला कचरा, प्लास्टिकचे तुकडे, पॉलिथीन, सुका पालापाचोळा तसेच इतर टाकाऊ वस्तू हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक स्थळे निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम उत्साहात पार पडली.
प्रत्यक्ष सहभाग घेत परिसरातील कचरा हटवला
या स्वच्छता अभियानात महापौर ज्योती गाडे (Mayor Jyoti Gade) यांनी स्वतः उपस्थित राहून स्वच्छतेत प्रत्यक्ष सहभाग घेत परिसरातील कचरा हटवला आणि नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी महानगरपालिकेचे माजी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक संपत बारस्कर, प्रकाश भागानगरे, यांसह पदाधिकारी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे ही प्रत्येकची जबाबदारी (AMC)
स्वच्छ उद्याने ही केवळ शहराच्या सौंदर्यात भर घालत नाहीत, तर नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीलाही बळकटी देतात. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. चला, स्वच्छ, सुंदर आणि हरित अहिल्यानगर घडविण्यासाठी आपण सर्वजण हातभार लावूया.



