Nasrapur Case Verdict : अखेर भीमराव कांबळेला फाशी; नरसापूर प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय

0
Nasrapur Case Verdict : अखेर भीमराव कांबळेला फाशी; नरसापूर प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
Nasrapur Case Verdict : अखेर भीमराव कांबळेला फाशी; नरसापूर प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय

नगर : पुण्यातील भोर तालुक्यामधील नसरापूर (Nasrapur Case Verdict) येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील झालेल्या अत्याचार प्रकरणाने (Atrocity Case) राज्यात खळबळ उडाली होती. आज या प्रकरणातील नराधम आरोपी ६५ वर्षीय भीमराव कांबळेला (Bhimrao Kamble) आज (ता.२९) पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा (Death penalty by hanging) ठोठावली. न्यायालयाने निकाल देताना, भीमराव कांबळेच्या कृत्याचा पाढा वाचताना, “आता फासावर चढा” अशा शब्दांत त्याला ठणकावलं. गेल्या काही दिवसांपासून या निकालाची चर्चा देशभरामध्ये झाली होती. पुणे पोलिसांनी अवघ्या १६ व्या दिवशी आरोपपत्र दाखल केलं. अवघ्या दोन महिन्यांमध्ये या प्रकरणाचा निकाल आल्याने पीडितेच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.

नक्की वाचा : ‘पीओपी’च्या गणेशमूर्तीचा वाद यंदा पुन्हा रंगणार;कारण काय?

पोलिसांचे न्यायालयाने केले कौतुक (Nasrapur Case Verdict)

नसरापूर प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने पुणे पोलिसांनी तपास केला आणि पुरावे सादर केले, त्या संदर्भात पोलिसांचे न्यायालयाने कौतुक केलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये सहभागी असणाऱ्या डॉक्टर, सायबर एक्सपर्ट, फॉरेन्सिक तज्ज्ञ यांचे सुद्धा कौतुक केलं आणि एक प्रकारे या आरोपीला फासावर लटकवण्यामध्ये हे सर्व पुरावे निर्णायक ठरल्याचे स्पष्ट केलं. या निकालामध्ये न्यायाधीशांनी “या नराधमासाठी फाशी पेक्षा कमीच शिक्षा असल्याचं” म्हटलं. न्यायालयाने या सुनावणी प्रकरणी विशेष सरकारी वकिलांचा सुद्धा उल्लेख केला. त्यांनी या प्रकरणामध्ये सचोटीने पाठपुरावा केला आणि या प्रकरणाचा तत्काळ निपटारा करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे एक प्रकारे ‘टीम वर्क’ असल्याचंही न्यायाधीशांनी आपल्या निकालामध्ये नमूद केलं.

अवश्य वाचा : केतनला संपवण्याचा प्लॅन आणखी काही जणांना माहिती; केतनच्या वडिलांचा संशय

अवघ्या १६ दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल  (Nasrapur Case Verdict)

न्यायालय म्हणाले की, “या आरोपीने ५३ वर्षांचा असतानाही एका कुटुंबातील एका मुलीवर अत्याचार प्रयत्न केला होता, तेव्हा सुद्धा ती मुलगी अल्पवयीन होती. एका म्हातारीवर देखील त्याने हल्ला केला, तसेच आणखी एका महिलेवर त्याने अत्याचार केला आहे. त्यामुळे या आरोपीला कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नाही, त्यामुळे त्याने सुधारण्याची पातळी ओलांडली आहे,”अवघ्या १६ दिवसांमध्ये या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर कोर्टामध्ये या प्रकरणाला पूर्ण वेळ देण्यात आला होता. त्यामुळे खटला १६ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये ५५ साक्षीदार तपासण्यात आले.