TET : नगर : महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपर फुटीच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर थेट संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा; पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय
पुढील वर्षापासून परीक्षा ‘ऑनलाइन’
शिक्षण मंत्र्यांनी उमेदवारांना दिलासा देताना जाहीर केले की, ही फेरपरीक्षा अत्यंत पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात घेतली जाईल. यासाठी उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही, कारण त्यांचे शुल्क आधीच स्वीकारण्यात आले आहे. तसेच, पुढील वर्षापासून टीईटीसह सर्वच परीक्षा पूर्णतः पारदर्शक पद्धतीने ‘ऑनलाइन’ घेता याव्यात, यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमली जाईल.
नक्की पहा : रिक्षा चालकाचा अनोखा उपक्रम; वृटपौर्णिमेसाठी महिलांना मदत
तीन आरोपींना अटक (TET)
पोलिसांना २७ जून २०२६ रोजी टीईटीची प्रश्नपत्रिका विकली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून तीन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांच्या तपासात २८ जून रोजी होणाऱ्या परीक्षेचे मूळ पेपर आढळून आले. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नपत्रिकांची खातरजमा केली असता, त्या खऱ्या असल्याचे स्पष्ट झाले.



