Anti-Corruption Bureau : घरकुलाच्या अनुदानासाठी २० हजारांची लाच; ग्रामविकास अधिकारी, लिपिक व गृहनिर्माण अभियंत्याविरुद्ध एसीबीची कारवाई

Anti-Corruption Bureau : घरकुलाच्या अनुदानासाठी २० हजारांची लाच; ग्रामविकास अधिकारी, लिपिक व गृहनिर्माण अभियंत्याविरुद्ध एसीबीची कारवाई

0

Anti-Corruption Bureau : नगर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) मंजूर झालेल्या घरकुलाचे पुढील अनुदान मिळवून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) राहुरी येथे सापळा रचून कारवाई केली. या प्रकरणात ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत लिपिक आणि गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Anti-Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न

ग्रामपंचायत लिपिक (कंत्राटी) ज्ञानदेव मोहन डुकरे यांनी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. तसेच ग्रामविकास अधिकारी हेदर याकूब पटेल आणि पंचायत समितीतील गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी) सचिन हौशीराम ब्राह्मणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

ईतरांचाही या प्रकरणात सहभाग (Anti-Corruption Bureau)

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला होता. त्यानंतर घरकुल मंजूर झाले असून पहिला व दुसरा अनुदान हप्ता मिळाला होता. मात्र पुढील हप्ता मंजूर करून देण्यासाठी आणि संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्याच्या मोबदल्यात आरोपींनी २० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ३० जून रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. कारवाईदरम्यान ग्रामपंचायत लिपिक (कंत्राटी) ज्ञानदेव मोहन डुकरे यांनी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. तसेच ग्रामविकास अधिकारी हेदर याकूब पटेल आणि पंचायत समितीतील गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी) सचिन हौशीराम ब्राह्मणे यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे एसीबीने नमूद केले आहे.

या तिघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.