Rasta Roko Movement : आरोपींना अटक न झाल्याने रास्ता रोको; माळीबाभुळगाव ग्रामस्थ आक्रमक

आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप

0
Rasta Roko Movement : आरोपींना अटक न झाल्याने रास्ता रोको; माळीबाभुळगाव ग्रामस्थ आक्रमक
Rasta Roko Movement : आरोपींना अटक न झाल्याने रास्ता रोको; माळीबाभुळगाव ग्रामस्थ आक्रमक

Rasta Roko Movement : पाथर्डी : माळीबाभुळगाव येथील युवकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल (Case Registered) होऊनही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी बुधवारी (ता.१) पाथर्डी–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर (Pathardi–Ahilyanagar National Highway) माळीबाभूळगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Movement) केले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

नक्की वाचा : मढेवडगाव येथे १७५५ मधील ऐतिहासिक शिलालेखाचा शोध; ‘वाबळे पाटील’ घराण्याच्या इतिहासावर प्रकाश

आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप

माळीबाभूळगाव येथील रहिवासी अक्षय रमेश भडके यांच्यावर २९ मे २०२६ रोजी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात ३ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात नारायण संजय बोरुडे, महेश राजू फुंदे व अन्य तीन अनोळखी आरोपींचा समावेश आहे. गुन्हा दाखल होऊन अनेक दिवस उलटूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आरोपी मोकाट फिरत असून पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आरोपींचे मनोबल वाढत असल्याचे आंदोलकांनी निवेदनात नमूद केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही तीव्र नाराजी (Rasta Roko Movement)

आंदोलनादरम्यान नागरिकांनी पाथर्डी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. सामान्य नागरिकांवर अन्याय होत असून पाथर्डी पोलीस अनेक प्रकरणांत गुन्हे दाखल करून घेत नाहीत. गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जाते. त्यामुळे गुन्हेगारांना अप्रत्यक्षपणे पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे. जीवघेण्या हल्ल्यासारख्या गंभीर गुन्ह्यातही आरोपींना अटक होत नाही. यामागे नेमकी कोणती शक्ती कार्यरत आहे, हा प्रश्न आम्हाला पडला आहे. पोलीस हे जनतेचे सेवक असताना जनतेलाच वेठीस धरण्याचे काम होत असून पोलिसांचा कारभार संशयास्पद आहे. अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या.

आरोपींना अटक करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल

रस्ता रोको आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव व गुप्तवार्ता विभागाचे नागेश वाघ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव यांनी आंदोलकांशी चर्चा करून या गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. तसेच नागरिकांच्या इतर कोणत्याही तक्रारी अथवा अडचणी असल्यास वरिष्ठ अधिकारी तसेच दुय्यम अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. संबंधित तक्रारींवर तातडीने दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन स्थगित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here