Teacher suspended : निवडणूक कामातील हलगर्जीपणा भोवला; गणेशवाडी येथील शिक्षक निलंबित

या कारवाईने कर्जतच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ

0
Teacher suspended : निवडणूक कामातील हलगर्जीपणा भोवला; गणेशवाडी येथील शिक्षक निलंबित
Teacher suspended : निवडणूक कामातील हलगर्जीपणा भोवला; गणेशवाडी येथील शिक्षक निलंबित

Teacher suspended : कर्जत : निवडणूक कामात (Election Duty) हलगर्जीपणा केल्याप्रकरणी महसुल विभागाकडून दोन बीएलओ वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी गणेशवाडी (ता.कर्जत) येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक रामकृष्ण मारुती शेटे यांना गुरुवारी (ता. २) जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी (Anand Bhandari) यांनी सेवेतून निलंबित (Teacher suspended) केले. या कारवाईने कर्जतच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

नक्की वाचा : मुरुम वाहतुकीच्या वादातून घरात घुसून गोळीबार; मालुंजे येथील घटना

राष्ट्रीय कामात टाळाटाळ

कर्जत तालुक्यात सध्या मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण काम सुरू आहे. या कामासाठी बीएलओ म्हणून कर्जत तालुक्यातील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. यात रामकृष्ण मारुती शेटे गणेशवाडी (ता. कर्जत) येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षकाची बीएलओ म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मात्र रामकृष्ण शेटे यांनी हेतू परस्पर राष्ट्रीय कामकाजात टाळाटाळ केली. तसेच विहित कालावधीत आपले कर्तव्य पार पाडले नाही म्हणून त्यांच्यावर महसुल विभागाच्या निवडणूक शाखेने कर्जत पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल केला होता. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

या कारवाईने कर्जतच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ (Teacher suspended)

त्या अनुषंगाने कर्तव्यात कसूर केल्या बाबतचा अहवाल गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कर्जत यांनी ३० जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्याकडे सादर केला होता. त्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी गुरुवार, (ता. २) रामकृष्ण मारुती शेटे यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्याचा आदेश पारित केला. या निलंबन कारवाईने कर्जतच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून कर्जतच्या इतिहासात प्रथमताच निवडणूकीच्या कामात कसूर केल्या प्रकरणी एका शिक्षकांवर अशी कार्यवाही झाली आहे.