Karjat Nagar Panchayat : कर्जतच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्या अविश्वास ठरावावर मंगळवारी विशेष सभा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पीठासीन अधिकारी म्हणून नितीन पाटील यांची नियुक्ती

0
Karjat Nagar Panchayat : कर्जतच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्या अविश्वास ठरावावर मंगळवारी विशेष सभा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Karjat Nagar Panchayat : कर्जतच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्या अविश्वास ठरावावर मंगळवारी विशेष सभा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Karjat Nagar Panchayat : कर्जत : मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने बुधवारी (ता. १) कर्जत नगरपंचायतीच्या (Karjat Nagar Panchayat) सत्ता संघर्षावर बहुमताने कायदेशीर बाबी पूर्ण करत निवडलेले सतीश पाटील हेच गटनेते पदी कायम राहणार असून कर्जतच्या नगराध्यक्ष पदाच्या रखडलेल्या अविश्वास ठरावावर दहा दिवसाच्या आत निर्णय घ्यावा असे आदेश जिल्हाधिकारी (District Collector) अहिल्यानगर यांना दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांची पीठासीन अधिकारी नियुक्ती करीत मंगळवार, (ता. ७) रोहिणी घुले यांच्या अविश्वास ठरावावर विशेष सभा आयोजित करण्याचे पत्र दिले. 

नक्की वाचा : मांडवगण येथे १६ व्या शतकातील २ ऐतिहासिक शिलालेखांचा शोध; यादव देशमुख घराण्याचा इतिहास उजेडात

दहा वाजता सर्व नगरसेवकांची विशेष सभा

कर्जत नगरपंचायतीच्या सत्ता संघर्षाची सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईस मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने बुधवारी (ता. १) पूर्ण विराम लावत सतीश पाटील यांची गटनेते पदाची निवड ग्राह्य धरत ती कायम राखली. यासह कर्जतच्या नगराध्यक्षा पदावरील अविश्वास ठरावावर दहा दिवसाच्या आत निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना दिले होते. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मंगळवारी, (ता. ७) कर्जत नगरपंचायतीच्या सभागृहात सकाळी दहा वाजता सर्व नगरसेवक-नगरसेविकांची विशेष सभा आयोजित केली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पीठासीन अधिकारी म्हणून नितीन पाटील यांची नियुक्ती (Karjat Nagar Panchayat)

त्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांची नियुक्ती केली. त्यामुळे पुन्हा एकदा कर्जत नगरपंचायतीमध्ये पदाधिकारी बदलाचे वारे वाहू लागले आहे. कर्जत नगरपंचायतीच्या सत्तेच्या समीकरणात पदाधिकाऱ्यांत सुरू असलेली धुसफूस साडे चार वर्षांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा नगराध्यक्षा पदावर अविश्वास ठराव आणण्याची नामुष्की ओढवली आहे. यावेळी सुद्धा कर्जत नगरपंचायतीच्या अविश्वास ठरावात १३ नगरसेवकांची संख्या कायम राहिली असून  भाजपाच्या मदतीला आमदार रोहित पवार गटाचे चार नगरसेवक मदतीला धावले आहे. घुले यांच्या बाजूने ४ नगरसेवक तटस्थ राहिले असून मंगळवारी (ता. ७) विशेष सभेत नेमका काय चमत्कार घडतो ? याकडे कर्जतकरांचे लक्ष लागले आहे.