Traffic Trial Run : शहरातील डीएसपी चौक व कायनेटिक चौकात ४ ते १० जुलैदरम्यान वाहतुकीचा ट्रायल रन

Traffic Trial Run : शहरातील डीएसपी चौक व कायनेटिक चौकात ४ ते १० जुलैदरम्यान वाहतुकीचा ट्रायल रन

0
Traffic Trial Run : शहरातील डीएसपी चौक व कायनेटिक चौकात ४ ते १० जुलैदरम्यान वाहतुकीचा ट्रायल रन
Traffic Trial Run : शहरातील डीएसपी चौक व कायनेटिक चौकात ४ ते १० जुलैदरम्यान वाहतुकीचा ट्रायल रन

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आवाहन

Traffic Trial Run : नगर : अहिल्यानगर शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध व नागरिकाभिमुख करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या वतीने डीएसपी चौक व कायनेटिक चौक येथे दि. ४ ते १० जुलै २०२६ या कालावधीत वाहतुकीचा ट्रायल रन (Traffic Trial Run) राबविण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या (Traffic Police) सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (District Collector Dr. Pankaj Ashiya) यांनी केले आहे.

वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण घटविण्याचा उद्देश

शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करणे, वाहतूक कोंडीची समस्या कमी करणे, अपघातांचे प्रमाण घटविणे तसेच नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नवीन वाहतूक व्यवस्था कायमस्वरूपी लागू करण्यापूर्वी तिची परिणामकारकता प्रत्यक्ष तपासणे आवश्यक असल्याने हा ट्रायल रन आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी संयम बाळगून वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन (Traffic Trial Run)

या प्रायोगिक कालावधीत नागरिकांचे सहकार्य, सूचना आणि अभिप्राय प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना, अभिप्राय आणि प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे वाहतूक व्यवस्था भविष्यात अधिक प्रभावी, सुरक्षित व नागरिकांच्या सोयीची करण्यात येणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षित वाहतूक संस्कृती रुजविण्यासाठी सर्व नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी कळविले आहे.