Stray Dogs : नगर : अहिल्यानगर शहरातील मोकाट कुत्र्यांचा (Stray Dogs) बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे नगरसेवक व पदाधिकारी महापालिकेत (Municipal Corporation) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. वारंवार निवेदन देऊनही महापालिका प्रशासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
नक्की वाचा : श्रीरामपूर गोळीबार प्रकरण; मुख्य आरोपीसह दोघांना २४ तासांत अटक
कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी
शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद घातला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी वाड्या पार्क टिळक रोड परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांना चावा घेतला आहे. या बाबत जखमींवर जिल्हा रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महानगरपालिका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित (Stray Dogs)
दरम्यान महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवण्यात आले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे माजी नगरसेवक संभाजी कदम, अनिल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संग्राम कोतकर, नलिनी गायकवाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



