Local Crime Branch : श्रीरामपूर गोळीबार प्रकरण; मुख्य आरोपीसह दोघांना २४ तासांत अटक

जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0
Local Crime Branch : श्रीरामपूर गोळीबार प्रकरण; मुख्य आरोपीसह दोघांना २४ तासांत अटक
Local Crime Branch : श्रीरामपूर गोळीबार प्रकरण; मुख्य आरोपीसह दोघांना २४ तासांत अटक

Local Crime Branch : नगर : श्रीरामपूर शहरातील म्हसोबा चौक परिसरात जुन्या वादातून झालेल्या गोळीबार (Firing) प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) कारवाई करत मुख्य आरोपीसह (Main Accused) दोन जणांना अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. या हल्ल्यात शुभम यादव हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

नक्की वाचा : पुणेवाडीत गुरुवारी श्री काळभैरवनाथ मूर्तीचा वज्रलेप पुन: प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन

जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी आणि त्याचा मित्र शुभम यादव हे पूर्णवादनगर, वार्ड क्रमांक ७ येथील म्हसोबा चौकात उभे असताना जुन्या वादाच्या कारणावरून अभय सुरेश ससाणे आणि त्याच्या पाच साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केला. सुरुवातीला लाकडी दांडके व इतर हत्यारांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर अभय ससाणे याने जवळील बंदुकीतून शुभम यादव याच्यावर गोळी झाडली. या गोळीबारात शुभम गंभीर जखमी झाला असून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सापळा रचून आरोपी ताब्यात (Local Crime Branch)

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपी अभय ससाणे हा साथीदारासह नाशिककडे पळून जात असल्याचे समोर आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने नाशिक रोड पोलिसांच्या मदतीने नाशिक येथे सापळा रचून अभय उर्फ अभी सुरेश ससाणे (वय २१, रा. अजतवाडी, श्रीरामपूर) आणि अक्षय किरण कपोते (वय २५, रा. म्हाडा कॉलनी, श्रीरामपूर) या दोघांना ताब्यात घेतले.

जुन्या वादातून हा हल्ला केल्याची कबुली

प्राथमिक चौकशीत दोघांनीही जुन्या वादातून हा हल्ला केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.