
Shri Kalbhairavnath : पारनेर : तालुक्यातील पुणेवाडी (Punewadi) येथील श्री काळभैरवनाथांच्या (Shri Kalbhairavnath) पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत, एक ऐतिहासिक (Historical) आणि धार्मिक सोहळा होत आहे. गुरुवार, (ता. ९) श्री काळभैरवनाथांच्या पुरातन मूर्तीचा ‘वज्रलेप पुन: प्रतिष्ठापना सोहळा’ अत्यंत भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.
नक्की वाचा : पारनेर-नगर मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना गती; दाते यांच्या पाठपुराव्याला यश
बाईक रॅलीचे आयोजन
या सोहळ्यासाठी बालयोगी सदानंद महाराज (तुंगारेश्वर पर्वत निवासी) आणि डॉ. नारायण महाराज जाधव (देवाची आळंदी) यांचे विशेष मार्गदर्शन व उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या शुभहस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. तर प्रमुख उपस्थिती मध्ये विश्वनाथ महाराज वारिंगे, डॉ. विकासानंदजी मिसाळ महाराज , सचिन महाराज शेटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोहळ्याची सुरुवात सकाळी १० वाजता पुणेवाडी फाटा येथून एका मिरवणुकीने होईल. यामध्ये तरुणांची बाईक रॅली आणि पारंपरिक वाद्यांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून जाणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
चांदीचे कोरीव काम असलेले मंदिर उभारण्याचा मानस (Shri Kalbhairavnath)
मिरवणूक मार्गावर ग्रामस्थांनी रांगोळ्या, फुलांची सजावट आणि फटाक्यांच्या आतषबाजीने बाबांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. सकाळी ११ वाजता विधीवत होम-हवन आणि धार्मिक विधींनंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल. त्यानंतर महाआरती आणि दर्शनासाठी भाविकांना प्रवेश दिला जाणार असून, शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, काळभैरवनाथांच्या मूर्तीसाठी कोरीव दगडांतून एक अत्यंत आकर्षक सिंहासन तयार करण्यात येत आहे. याशिवाय, प्राणप्रतिष्ठापनेनंतर या सिंहासनावर सुमारे ४० किलो वजनाचे चांदीचे कोरीव काम असलेले मंदिर उभारण्याचा मानस ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
पुणेवाडी ग्रामस्थांनी या आध्यात्मिक सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण केली असून, परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे पुणेवाडीमध्ये सध्या उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण पसरले आहे.


