Theft : राहुरी : तमनर आखाडा येथील भिसे वस्तीमध्ये अज्ञात चोरट्यांनी (Thieves) एका कापड दुकान व्यवसायीकाच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने (Gold jewelry) असा एकूण ३ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन (Theft) नेल्याची घटना शुक्रवारी (ता. ३) सायंकाळी घडली. या घटनेमुळे तमनर आखाडा परिसरात खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा : दिवसातले ८ तास भारनियमन वीज बिल मात्र ४२ हजार; महावितरणचा आंधळा कारभार
फिर्यदीत म्हटले आहे की
फिर्यादी अरुण साहेबराव भिसे (वय ३४ वर्ष, राहणार तमनर आखाडा भिसे वस्ती) यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार घर मालक अरुण भिसे यांचे सोनई येथे कपड्यांचे दुकान आहे ते (ता. ३) सायंकाळी सुमारे ५ वाजता आपले सोनई येथील दुकान बंद करून तमनर आखाडा येथील घरी येत दिवसभराच्या विक्रीतील तसेच कपडे खरेदीसाठी आणलेली १ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवली व त्याच लॉकरमध्ये त्यांच्या आई व पत्नीचे सुमारे १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे पावणेदोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, त्यामध्ये कानातील कर्णफुले, मनीमंगळसूत्र व मण्याची पोत ठेवलेली होती.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
साहित्याची उचकापाचक झाल्याचे निदर्शनास (Theft)
त्यानंतर ते त्यांची पत्नी व आई घराला कुलूप लावून सायंकाळी सुमारे ७ वाजता गावात कार्यक्रमानिमित्त गेले त्यानंतर ते रात्री सुमारे १०.१५ वाजता घरी परतल्यानंतर घरात प्रवेश केल्यावर त्यांना बेडरूममधील कपाटातील कपडे व साहित्याची उचकापाचक झाल्याचे निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी किचनमध्ये जाऊन पाहिले असता घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून दरवाजा उघडल्याचे आढळले त्यानंतर त्यांनी कपाटातील लॉकरची पाहणी केली असता त्यामधील रोख १ लाख ६० हजार रुपये व १ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, असा एकूण ३ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
गुन्हा दाखल
अज्ञात चोरट्यांनी सायंकाळी ७ ते रात्री १०.१५ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या तपासासाठी अहिल्यानगर येथील ठसे तज्ञ व श्वान पथक यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



