Mahavitaran : शेवगाव : महावितरणच्या (Mahavitaran) आंधळ्या कारभाराचा एक नमुना पुढे आला असून दिवसभरात ६ तास भारनियमन (weight Regulation) असताना आणि पुन्हा चार तास वीज (Electricity) गायब असताना घरगुती ग्राहकाला महिन्याचे तब्बल ४२ हजार रुपयांचे बिल पाठवण्याचा पराक्रम महावितरणने केला आहे. महावितरण कंपनीच्या या कारभारामुळे हे बिल वीज वापराचे आहे की भारनियमन केल्याचे असा प्रश्न ग्राहकाला पडला आहे.
नक्की वाचा : स्मार्ट मीटरमुळे अधिकाऱ्यांची कोंडी, पालघरला निलंबन, अहिल्यानगरमध्येही अडचण
रात्री ऐन वापराच्या वेळेस वीज बंद
शेवगांव तालुक्यातील ग्राहक बाबासाहेब गर्जे (रा. नजिक बाभुळगाव) यांना महावितरणे जून महिन्याचे तब्बल ४२ हजार रुपये बिल पाठवले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या गावात मार्च २०२६ पासून म्हणजेच गेल्या चार महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरु आहे. सुरवातीला सायंकाळी ६ ते रात्री ९ यादरम्यान तीन तासांचे भारनियमन सुरु होते. यामध्ये दुप्पट वेळेची वाढ करुन सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत त्यात वाढ केली. म्हणजे रात्री ऐन वापराच्या वेळेस वीज बंद असते. शिवाय दिवसभरातही दोन-दोन, तीन-तीन तास कधी तर दिवसभर वीज गायब असते. त्यामुळे गेली तीन महिने या गावातील नागरिकांना उकाड्याचाही प्रचंड त्रास सहन करावा लागला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
चार-पाच तास विजेचा लपंडाव (Mahavitaran)
याबाबत आंदोलन करुनही महावितरणच्या भोंगळ कारभारात कोणतीही सुधारणा झाली नाही. आता संतापजनक बाब म्हणजे चोवीस तासांपैकी ६ तास सक्तीचे भारनियमन आणि चार-पाच तास विजेचा लपंडाव असताना बील मात्र सरासरी एक हजार रुपयांवरुन थेट ४२ हजार रुपयांवर गेले आहे. ग्राहकांसाठी ही बाब अत्यंत मनस्ताप देणारी असून याबाबत अंतर्गत ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल करणार असल्याचे ग्राहक बाबासाहेब गर्जे यांनी सांगितले.



