Pathardi Police : पाथर्डी येथील छेडछाड प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात; पोलिसांकडून खाकीचा धाक

राजळे यांनी दिल्या कारवाई करण्याच्या सूचना

0
Pathardi Police : पाथर्डी येथील छेडछाड प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात; पोलिसांकडून खाकीचा धाक
Pathardi Police : पाथर्डी येथील छेडछाड प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात; पोलिसांकडून खाकीचा धाक

Pathardi Police : पाथर्डी : शहरातील एका विद्यालयात अकरावीतील विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या (Teasing) प्रकरणात शनिवारी (ता. ४) पाथर्डी पोलिसांनी (Pathardi Police) कारवाई करत तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्यांना समज देण्यात आली तसेच अशा प्रकाराची पुनरावृत्ती झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. मात्र संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांनी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या भूमिकेतून औपचारिक तक्रार देण्यास नकार (Refusal to complain) दिला.

नक्की वाचा : बोगस नोटरीच्या आधारे संस्थेवर ताबा; डॉ. राकेश गांधी दांपत्यासह इतरांविरुद्ध गुन्हा

राजळे यांनी दिल्या कारवाई करण्याच्या सूचना

शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी (ता. ३) शहरातील एका विद्यालयाच्या मैदानात चार अल्पवयीन मुलांनी अकरावीतील विद्यार्थिनींना घेरून छेडछाड, शिवीगाळ व त्रास दिल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर संतप्त पालक, महिला व इंदिरानगर परिसरातील नागरिकांनी शाळा प्रशासन आणि पाथर्डी पोलीस ठाण्यात धाव घेत कारवाईची मागणी केली होती. त्या वेळी तक्रार नोंदवून न घेतल्याचा आरोप पालकांनी केला होता. घटनेची माहिती संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांनी आमदार मोनिका राजळे यांना दूरध्वनीवरून दिली होती. त्या मुंबई येथे अधिवेशनासाठी उपस्थित असल्याने त्यांनी तत्काळ पाथर्डी पोलिसांशी संपर्क साधून पालकांची तक्रार घेऊन आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तक्रार दाखल करण्यास नकार (Pathardi Police)

यानंतर शनिवारी (ता. ४) पोलिसांनी संबंधित तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात त्यांची समजूत काढण्यात आली तसेच पालकांनाही बोलावून भविष्यात अशा प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, पोलिसांनी विद्यार्थिनींच्या पालकांना तक्रार देण्यास सांगितले; मात्र मुलांचे भवितव्य व शैक्षणिक नुकसान होऊ नये, या विचारातून त्यांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला. मुलींची छेडछाड करणारे हे दहावी व अकरावी वर्गात शिक्षण घेणारे विद्यार्थी होते .