Bogus Notary : नगर : शहरातील एका नामांकित धर्मादाय संस्थेच्या कार्यकारी मंडळावर बनावट कागदपत्रे व खोट्या नोटरीच्या (Bogus Notary) आधारे बेकायदेशीरपणे ताबा मिळवल्याप्रकरणी डॉ. राकेश गांधी, त्याची पत्नी व इतरांविरुद्ध फसवणूक (Fraud), बनावट कागदपत्रे तयार करणे व विश्वासघाताचा गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.
नक्की वाचा : मुळा धरण पाणलोट क्षेत्रात नवीन पाण्याची आवक; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
यासंबंधी शहरातील उद्योजक तथा रेज फाऊंडेशन ट्रस्टचे सचिव अमित रसिकलाल कोठारी (वय ४५, रा. अहिल्यानगर ) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. राकेश कांतीलाल गांधी, राजश्री राकेश गांधी (दोघे रा. प्लॅट नंबर 1, महादेव अपार्टमेंट, पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर), मोहित कांतीलाल बोरा (रा. शिल्पा अपार्टमेंट, नगर-पुणे रोड, अहिल्यानगर) व इतर अज्ञात यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार व कर्जाची उचल (Bogus Notary)
कोठारी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, सावेडी येथील पाईपलाईन रोडवरील महादेव अपार्टमेंट येथील फ्लॅट नंबर 1 मध्ये रेज फाऊंडेशन या धर्मादाय संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय आहे. अमित कोठारी हे सचिव असून त्यांची पत्नी श्वेता कोठारी याही संस्थेच्या सदस्य आहेत. त्यांचे दिवंगत वडील रसिक चंदूलाल कोठारी या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. त्यांचे १८ जून २०२३ रोजी निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये कोठारी एचडीएफसी बँकेत गेले. त्यांनी वडिलांच्या नावावरील खाती व इतर आर्थिक व्यवहारांची माहिती घेतली. तेव्हा त्यांना रेज फाऊंडेशनच्या नावे एचडीएफसी बँकेत खाते असून, त्या खात्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार व कर्जाची उचल झाल्याचे निदर्शनास आले.
सर्वसाधारण सभा झाल्याचे कागदोपत्री दाखवले
त्यांनी सखोल चौकशी केली असता, संस्थेचे उपाध्यक्ष योगेश बाफना यांच्याकडून संस्थेचा अजेंडा बुक व प्रोसिडिंग बुक मागवण्यात आले. या तपासणीत असे आढळले की, ८ फेब्रुवारी २०२२ रोजी सर्वसाधारण सभेचा अजेंडा काढल्याचे व २३ फेब्रुवारी २०२२ रोजी सर्वसाधारण सभा झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अशा कोणत्याही सभा झाल्याच नव्हत्या, असा कोठारी यांचा आरोप आहे. या तथाकथित सभांना कोणतीही नोटीस, सूचना वा माहिती संस्थेच्या सदस्यांना देण्यात आली नव्हती. तरीही कोठारी व त्यांच्या पत्नीने सभेस उपस्थित राहून सह्या केल्याचे बनावट रजिस्टरवर दाखवण्यात आले आहे, असेही कोठारी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या बनावट कागदपत्रांआधारे डॉ. राकेश कांतीलाल गांधी व त्यांची पत्नी राजश्री राकेश गांधी यांची संस्थेच्या पदावर निवड झाल्याचे भासवण्यात आले.
केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाच्या नोटरी सेलकडे तक्रा
संबंधित कागदपत्रांवर अॅड. जे. डी. कुसमोडे या नोटरी पब्लिकचे शिक्के व सह्या वापरण्यात आल्या होत्या. मात्र कोठारी यांनी अहमदनगर विभागाच्या धर्मादाय उपायुक्तांकडे चेंज रिपोर्ट पडताळणी केली असता, संबंधित नोटरींनी अशी कोणतीही नोंद आपल्या नोटरी रजिस्टरमध्ये केली नसल्याचे स्पष्ट झाले. यासंबंधी कोठारी यांनी केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाच्या नोटरी सेलकडे तक्रार केली. त्यातील चौकशीअंती २२ डिसेंबर २०२५ रोजी अॅड. कुसमोडे यांची नोटरी सनदच रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली. मोहित कांतीलाल बोरा या एजंटामार्फत ही बनावट सही व शिक्का मिळवण्यात आल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. तसेच तारखांमधील विसंगतीही उघड झाली.
फेब्रुवारी २०२२ मधील कथित सभांची कागदपत्रे प्रत्यक्षात ऑगस्ट २०२२ नंतर तयार करण्यात आल्याचे तसेच नोटरी एक्सप्रायरीच्या तारखेवरूनही स्पष्ट झाल्याचा दावा कोठारी यांनी फिर्यादित केला आहे.



