Onion-Growing Farmers | कांदा उत्पादकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा; बफर स्टॉकसाठी कांद्याच्या खरेदी दरात १३ टक्क्यांची वाढ

0

Onion-Growing Farmers | नगर : केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion-Growing Farmers) मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारने आपल्या बफर स्टॉकसाठी कांद्याच्या खरेदी दरात १३ टक्क्यांची वाढ केली. नवीन दर दोन हजार १२५ रुपये प्रती क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. चालू हंगामात सरकारी खरेदीचा वेग मंदावल्यामुळे सरकारला तब्बल पाचव्यांदा खरेदी दरात वाढ करावी लागली. सध्या देशभरातील बाजार समित्यांमध्ये दररोज ५० हजार टनांपेक्षा जास्त कांद्याची आवक होत आहे. यातील जवळपास ६० टक्के टनांहून अधिक आवक एकट्या महाराष्ट्रातून होत आहे.

हे वाचा – पाथर्डी येथील छेडछाड प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात; पोलिसांकडून खाकीचा धाक

बाजारातील भाव आणि सरकारी दर (Onion-Growing Farmers)

नवीन बदललेले दर ४ जुलै २०२६ पासून देशभरात लागू करण्यात आले आहेत. किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत यंदा सरकारी पातळीवर कांद्याची खरेदी खूपच संथ गतीने सुरू आहे. बाजारातील भाव आणि सरकारी दर यातील फरकामुळे १ जूनपासून सरकारला केवळ दोन हजार टन कांदा खरेदी करता आला आहे. हीच अडचण दूर करण्यासाठी सरकारने या चालू हंगामात तब्बल पाचव्यांदा खरेदी दरात वाढ केली आहे. हंगामाच्या सुरुवातीला सरकारी खरेदीचा दर फक्त १२.७० रुपये प्रती किलो होता. त्यानंतर २२ मे रोजी तो १५.८० रुपये, १३ जून रोजी १६.५० रुपये, २० जून रोजी १७.३० रुपये आणि पुढे तो १८.७५ रुपयांपर्यंत वाढवण्यात आला. मात्र, तरीही खरेदीने वेग न घेतल्याने अखेर सरकारने आता २१. २५ रुपये प्रती  किलोचा नवा उच्चांकी दर निश्चित केला आहे. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, यंदा देशात ३०७.३७ लाख टन कांद्याचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे, जे गेल्या वर्षीच्या उत्पादनाइतकेच आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या मते, देशात सध्या कांद्याची टंचाई नाही. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या प्रमुख राज्यांमध्ये कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

नक्की वाचा : बोगस नोटरीच्या आधारे संस्थेवर ताबा; डॉ. राकेश गांधी दांपत्यासह इतरांविरुद्ध गुन्हा

जास्त कांद्याची आवक (Onion-Growing Farmers)

दरम्यान, सध्या देशभरातील बाजार समित्यांमध्ये दररोज ५० हजार टनांपेक्षा जास्त कांद्याची आवक होत आहे. यातील जवळपास ६० टक्के म्हणजेच ३० हजार टनांहून अधिक आवक एकट्या महाराष्ट्रातून होत आहे. महाराष्ट्रातील बाजारात सध्या कांद्याला सरासरी १८ रुपये प्रती किलोचा भाव मिळत आहे, तर देशभरात कांद्याचा सरासरी किरकोळ विक्री दर ३१ रुपये प्रती किलोच्या आसपास आहे. यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाल्यामुळे आणि काही भागात कमी पाऊस पडल्यामुळे नाशिक आणि मध्य प्रदेशातील काही बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांकडून कांद्याची साठवणूक केली जात आहे. चांगल्या दर्जाचा कांदा सध्या साठवून ठेवला जात असून, पुढे सणासुदीच्या काळात किंवा टंचाईच्या वेळी तो बाजारात आणण्याचा व्यापाऱ्यांचा मानस आहे. त्यामुळे सध्या घाऊक बाजारात प्रत्यक्ष मागणी थोडी मंदावली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

दुसरीकडे, महाराष्ट्रातील मुख्य कांदा पट्टा असलेल्या नाशिक भागात खरीप कांद्याची पेरणी जवळपास १५ दिवस उशिराने सुरू आहे. तर कर्नाटकातील चित्रदुर्ग आणि चल्लाकेरे भागात पेरणीचे काम केवळ ६० टक्क्यांपर्यंतच पोहोचू शकले आहे. निर्यात क्षेत्राचा विचार केला तर जून महिन्यात भारताने सुमारे १. ५० लाख टन कांदा परदेशात पाठवला. मात्र, आगामी काळात भारतीय कांद्याची निर्यात मंदावण्याची भीती व्यापाऱ्यांना वाटत आहे. आखाती देश, श्रीलंका आणि पूर्व बाजारपेठांमध्ये पाकिस्तान आणि चीनचा नवा कांदा अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध झाल्याने भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here