Toll Waiver : पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी; ६ ते २९ जुलैदरम्यान सवलत लागू

0
Toll Waiver : पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी; ६ ते २९ जुलैदरम्यान सवलत लागू
Toll Waiver : पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी; ६ ते २९ जुलैदरम्यान सवलत लागू

Toll Waiver : नगर : आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आणि भाविकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ६ जुलै ते २९ जुलै २०२६ या कालावधीत पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या वाहनांना टोलधनी (टोलमाफी) देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे.या निर्णयांतर्गत वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांसह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विशेष बसेसनाही या टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.

हेही वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; नदीकाठावरील गावातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

१० मानाच्या पालखी मार्गांवर सवलत

पंढरपूरला जाणाऱ्या १० प्रमुख मानाच्या पालख्यांच्या मार्गावरील सर्व टोल नाक्यांवर ही सूट लागू असेल. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व टोल प्लाझाचा समावेश आहे. ही सवलत वारकऱ्यांच्या जाण्या-येण्याच्या (दोन्ही बाजूच्या) प्रवासासाठी वैध असेल.

नक्की पहा : नगर शहरातील एकविरा चौक ते तपोवन रस्ता काँक्रीटीकरणासाठी खोदला; पावसामुळे नागरिकांची कसरत

टोलमाफीसाठी पासेस अनिवार्य (Toll Waiver)

टोल नाक्यांवर कोणतीही अडचण येऊ नये म्हणून भाविकांच्या वाहनांवर विशेष स्टिकर्स किंवा पासेस लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पासवर ‘आषाढी एकादशी यात्रा २०२६’, गाडी क्रमांक आणि चालकाचे नाव असणे आवश्यक आहे. हे पासेस वारकऱ्यांना या ठिकाणी मोफत उपलब्ध करून दिले जात आहेत. स्थानिक पोलीस ठाणे वाहतूक पोलीस चौक्या, प्रादेशिक परिवहन कार्यालय मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी सर्व यंत्रणांना वारकऱ्यांच्या वाहनांना विनाअडथळा आणि प्राधान्याने रस्ता देण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यभरातून विठ्ठल दर्शनासाठी निघणाऱ्या दिंड्या आणि भाविकांचा प्रवास अधिक सुकर आणि आर्थिकदृष्ट्या सोयीचा होणार आहे.