Road Closed : मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद

0
Road Closed : मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद
Road Closed : मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद

Road Closed : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाल्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाने जिल्ह्यातील दोन प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी तात्पुरते बंद केले आहेत. प्रशासनाने नागरिकांना बंद मार्गांवरून प्रवास न करण्याचे आणि पर्यायी सुरक्षित मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; नदीकाठावरील गावातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

बंद करण्यात आलेले रस्ते

पेडगाव – शेडगाव मार्ग बंद
प्रभावित मार्ग : निमगाव खलू – कौठा – अजनुज – पेडगाव – शेडगावकारण: येथील सरस्वती नदीवरील पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

आर्वी पुनर्वसन – अजनुज मार्ग बंद
प्रभावित मार्ग : कौठा – अनगरे – आर्वी – अजनुज – श्रीगोंदाकारण: येथील पाईप मोरीवरून पाणी वाहत असल्यामुळे सुरक्षेसाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

नक्की पहा : नगर शहरातील एकविरा चौक ते तपोवन रस्ता काँक्रीटीकरणासाठी खोदला; पावसामुळे नागरिकांची कसरत

प्रशासनाचा इशारा (Road Closed)

पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने कोणताही धोका पत्करू नका. पूर ओसरल्याशिवाय या मार्गांवरून प्रवास करणे टाळा. बंद मार्गांवरून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये. तसेच पर्यायी सुरक्षित मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.