
Godavari River : अहिल्यानगर : नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून (Nandur Madhmeshwar Weir) सुरू असलेला पाण्याचा विसर्ग सोमवार, ६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता वाढविण्यात आला असून तो ८०७ क्युसेकवरून १ हजार ६१४ क्युसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने गोदावरी नदीपात्रालगतच्या (Godavari River) परिसरातील नागरिकांनी सतर्क (Alert) राहावे, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाने केले आहे.
१ हजार ६१४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू
नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार सकाळपासून नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून ८०७ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र सायंकाळी ६ वाजता विसर्गात वाढ करून तो एकूण १ हजार ६१४ क्युसेक करण्यात आला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता (Godavari River)
सध्या सुरू असलेल्या पावसाचा विचार करता धरणातून होणाऱ्या विसर्गात पुढील काळात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्रालगतच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीपात्रात किंवा नदीकाठावर ठेवलेले साहित्य, जनावरे व अन्य वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात. तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी व संबंधित प्रशासकीय विभागांनीही परिस्थितीवर लक्ष ठेवून योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोशल शहाणे यांनी केले आहे.


