Country-made Pistol : नगर : श्रीरामपूर तालुक्यातील वाकडी रोड परिसरात गावठी कट्टा (Country-made Pistol) बाळगणारे चार संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून गावठी कट्टा दोन जिवंत काडतुसे (Live cartridge) गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण पाच लाख 95 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : पाथर्डी तालुक्यातील पाच गावांत कथित गुन्हेगारी टोळीचा धुमाकूळ
संशयित आरोपींची नावे
सागर दत्तु उपळकर (वय २८), विशाल रामकिसन गुंजाळ, ऋतीक भगवान गुंजाळ (वय २५), पवन गोरख उपळकर वय २७ सर्व रा. रामपुर ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सापळा रुचून संशयित आरोपींना ताब्यात (Country-made Pistol)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रामपूर तालुक्यातील वाकडी रस्त्याने श्रीरामपूर कडे गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रुचून संशयित आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून गावठी कट्टा दोन जिवंत काडतुसे व गुन्ह्यात वापरलेली चार चाकी असा एकूण पाच लाख 95 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेत नेमणूक असलेले अमलदार रमीजराजा रफीक आत्तार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव पोलीस अंमलदार फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, शामसुंदर जाधव, रमिजराजा आतार, भगवान थोरात, प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली आहे.



