Karjat Nagar Panchayat : कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पदासाठी भाजपच्या छाया शेलार यांचा एकमेव अर्ज दाखल

अविश्वास ठरावापूर्वीच रोहिणी घुले यांचा राजीनामा

0
Karjat Nagar Panchayat : कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पदासाठी भाजपच्या छाया शेलार यांचा एकमेव अर्ज दाखल
Karjat Nagar Panchayat : कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पदासाठी भाजपच्या छाया शेलार यांचा एकमेव अर्ज दाखल

Karjat Nagar Panchayat : कर्जत : कर्जत नगरपंचायतीच्या (Karjat Nagar Panchayat) रिक्त झालेल्या नगराध्यक्षा पदासाठी भाजपकडून छाया सुनील शेलार (Chhaya Sunil Shelar) यांनी मंगळवारी (ता. ७) दुपारी आपला उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी अक्षय जायभाये यांच्याकडे दाखल केला. या अर्जावर सूचक म्हणून गटनेते सतीश पाटील तर अनुमोदन म्हणून नगरसेविका लंकाबाई खरात यांनी स्वाक्षरी केल्या. नगराध्यक्षा पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने छाया शेलार यांची बिनविरोध निवड (Uncontested Election) झाली. मात्र त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा शुक्रवारी, (ता. १०)  होईल. सत्तांतर घडवताना अखेर राम शिंदे यांनी दिलेला शब्द या निवडीने पूर्ण झाला. 

नक्की वाचा : नाशिक–पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात कोसळली दरड; जीवितहानी टळली

अविश्वास ठरावापूर्वीच रोहिणी घुले यांचा राजीनामा

सोमवारी, (ता. ६) कर्जतच्या तत्कालीन नगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले यांनी अविश्वास ठरावापूर्वीच आपला राजीनामा जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्याकडे दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पंकज आशिया यांनी मंगळवारी (ता. ७) नगराध्यक्षा पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. यासाठी कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांची पीठासीन अधिकारी म्हणून निवड करीत मंगळवार, (ता. ७) सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत कर्जत नगराध्यक्षा पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार भाजपाचे ९ आणि आमदार रोहित पवार गटाचे ४ अशा १३ नगरसेवकांच्या सहमतीने भाजपकडून छाया सुनील शेलार यांचा एकमेव अर्ज दुपारी सव्वा एक वाजता दाखल करण्यात आला. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शेलार यांचा अर्ज वैध (Karjat Nagar Panchayat)

या अर्जावर सूचक म्हणून गटनेते सतीश पाटील तर अनुमोदन म्हणून नगरसेविका लंकाबाई खरात यांनी स्वाक्षरी केली. यावेळी नगरसेवक अमृत काळदाते, प्रसाद ढोकरीकर, जेष्ठनेते अशोक खेडकर, भाजपाचे मंडळ अध्यक्ष अनिल गदादे, युवा मोर्चाचे स्वप्नील तोरडमल यांच्यासह सुनील शेलार, देवा खरात आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी संत सदगुरु गोदड महाराज यांचा जयघोष केला. प्राप्त नगराध्यक्षा पदाच्या एकमेव उमेदवारी अर्जाची छाननी प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी पार पाडली. यात शेलार यांचा अर्ज वैध ठरला. कर्जत नगराध्यक्षा पदासाठी छाया शेलार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. मात्र त्याची अधिकृत घोषणा शुक्रवारी (ता. १०) केली जाईल.