SIR : उत्कृष्ट कामगिरीबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा गौरव

0
SIR : उत्कृष्ट कामगिरीबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा गौरव
SIR : उत्कृष्ट कामगिरीबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा गौरव

SIR : नगर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत अवघ्या आठ दिवसांत शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणारे मास्टर ट्रेनर तथा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अमोल सुभाषराव शिंदे यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

नक्की पहा : हायवेवर पोलिसांकडून अपहरण झालेल्या पर्यटकांची अशी झाली सुटका

अल्पावधीत उद्दिष्ट साध्य

२२५ अहमदनगर शहर मतदारसंघातील यादी भाग क्रमांक ५७ मधील एकूण एक हजार ३१ मतदारांना गणना प्रपत्रांचे वितरण, त्यांचे संकलन, पडताळणी आणि डिजिटायझेशनचे कार्य अमोल शिंदे यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केले. उत्कृष्ट नियोजन, प्रभावी समन्वय आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या बळावर त्यांनी हे उद्दिष्ट अल्पावधीत साध्य केले. यावेळी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार स्वप्निल ढवळे, नायब तहसीलदार सुधीर उबाळे तसेच निवडणूक विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात झाली अवघी ५१ टक्के खरीप पेरणी

यांचे सहकार्य (SIR)

याच कार्यक्रमांतर्गत २२७ कर्जत-जामखेड मतदारसंघातील यादी भाग क्रमांक ४५, माळेवाडी येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अनिता टिपगुडे यांनी ३५५ मतदारांचे, तर यादी भाग क्रमांक ५१ मधील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संगिता विष्णू कुटे यांनी ३३४ मतदारांचे गणना प्रपत्र वितरण, संकलन, पडताळणी व डिजिटायझेशनचे कार्य पूर्ण केले. या कामासाठी त्यांना मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, सहायक मतदार नोंदणी अधिकारी रवि सातवन, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.