Ashadhi Vari : ‘आरोग्य सेवा’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद; तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांवर मोफत उपचार

Ashadhi Vari : ‘आरोग्य सेवा’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद; तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांवर मोफत उपचार

0

Ashadhi Vari : नगर : जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त Medical Youths Welfare Foundation आणि Nursing Student Welfare Foundation, Maharashtra यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ जुलै २०२६ रोजी विठ्ठलवाडी, विठ्ठल मंदिराजवळ (पालखी मुक्काम), आकुर्डी, पिंपरी-चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्य सेवा’ उपक्रमास वारकरी व भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

हेही वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात झाली अवघी ५१ टक्के खरीप पेरणी

हजारो वारकऱ्यांची सेवा

या आरोग्य सेवा शिबिरामध्ये १,५०० हून अधिक वारकरी व भाविकांवर मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले. रुग्णांना आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले तसेच प्राथमिक उपचार, रक्तदाब तपासणी, सल्ला व आपत्कालीन आरोग्य सेवा देण्यात आली. या उपक्रमात डॉक्टर, नर्सिंग विद्यार्थी, वैद्यकीय विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी डॉक्टर तसेच आरोग्य विभागातील स्वयंसेवकांनी दिवसभर निःस्वार्थपणे सेवा देत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. पालखी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरली.

नक्की पहा : हायवेवर पोलिसांकडून अपहरण झालेल्या पर्यटकांची अशी झाली सुटका

वारकऱ्यांकडून आभार (Ashadhi Vari)

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व डॉक्टर, स्वयंसेवक, नर्सिंग विद्यार्थी, वैद्यकीय विद्यार्थी, सहकार्य करणाऱ्या संस्था तसेच उपस्थित सर्व वारकरी व भाविकांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले. पालखी मार्गावरील आरोग्य सेवेची ही परंपरा पुढेही अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्याचा निर्धार संस्थांनी व्यक्त केला.