Khatal Vs Tambe : संगमनेर पाणीपुरवठा योजना निविदा वाद; आमदार खताळांच्या आरोपांना दुर्गा तांबे यांचे प्रत्युत्तर

0
Khatal Vs Tambe : संगमनेर पाणीपुरवठा योजना निविदा वाद; आमदार खताळांच्या आरोपांना दुर्गा तांबे यांचे प्रत्युत्तर
Khatal Vs Tambe : संगमनेर पाणीपुरवठा योजना निविदा वाद; आमदार खताळांच्या आरोपांना दुर्गा तांबे यांचे प्रत्युत्तर

Khatal Vs Tambe : नगर : संगमनेर शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रियेवरून संगमनेरचे राजकारण चांगलेच तापले असून, या प्रकरणातील आरोपांना माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या कथित अनियमिततेच्या मुद्द्यावर बोलताना दुर्गा तांबे यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

हेही वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात झाली अवघी ५१ टक्के खरीप पेरणी

‘आरोप राजकीय हेतूने प्रेरित’

ही योजना पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने आणि शहराच्या हितासाठीच राबवली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राजकीय हेतूने प्रेरित होऊनच या योजनेला आणि निविदा प्रक्रियेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही त्यांनी विरोधकांवर केली. दुसरीकडे, आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडल्यानंतर राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

नक्की पहा : हायवेवर पोलिसांकडून अपहरण झालेल्या पर्यटकांची अशी झाली सुटका

चौकशीचे आदेश (Khatal Vs Tambe)

या कथित अनियमिततेची अतिरिक्त मुख्य सचिव (नगर विकास) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत केली. ही समिती येत्या दोन महिन्यांत आपला सविस्तर अहवाल शासनाला सादर करणार असून, या अहवालानुसार जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री मिसाळ यांनी दिले आहे. सरकारकडून चौकशीची घोषणा झाली असली तरी, दुर्गा तांबे यांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे या पाणीपुरवठा योजनेच्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे.