Akole : नगर : गेल्या दोन दिवसांपासून अकोले तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुरक्षेचा उपाय म्हणून बंद करण्यात आलेले पर्यटन पुन्हा सुरू झाले आहे. पावसाचा जोर ओसरल्याने आणि परिस्थिती पूर्ववत झाल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला असून सह्याद्रीच्या कुशीतील निसर्ग अनुभवण्यासाठी पर्यटकांना पुन्हा वाट मोकळी झाली आहे. पर्यटनस्थळांवर पुन्हा पर्यटकांची गर्दी पाऊस कमी होताच अकोले तालुक्यातील प्रसिद्ध धबधबे, हिरव्यागार डोंगररांगा आणि विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची पावले पुन्हा वळू लागली आहेत.
नक्की पहा : हायवेवर पोलिसांकडून अपहरण झालेल्या पर्यटकांची अशी झाली सुटका
‘धोकादायक ठिकाणी जाणे टाळा’
निसर्गाचे विहंगम रूप पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती सर्व खबरदारी आणि पूर्वतयारी घेण्यात आली आहे.
पर्यटन पूर्ववत सुरू झाले असले तरी पर्यटकांनी अतिउत्साहाच्या भरात स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले आहे. “पर्यटनाचा आनंद घेताना स्वतःच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य द्यावे. प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे व सूचनांचे काटेकोर पालन करावे. खोल पाणी किंवा कड्याच्या कडेला अशा धोकादायक ठिकाणी जाणे पूर्णपणे टाळावे आणि जबाबदारीने निसर्गाचा आनंद घ्यावा,” असे डॉ. लहामटे म्हणाले.
हेही वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात झाली अवघी ५१ टक्के खरीप पेरणी
‘अकोल्याच्या रम्य निसर्गात पर्यटकांचे स्वागत’ (Akole)
आमदार डॉ. किरण लहामटे यांनी पर्यटकांचे स्वागत करताना सांगितले, “निसर्गसौंदर्याने नटलेल्या माझ्या अकोले तालुक्यात सर्व पर्यटकांचे मनःपूर्वक स्वागत आहे. सुरक्षित राहून पर्यटन करा आणि अकोल्याच्या या रम्य, देखण्या निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्या.” असे ते म्हणाले.



