Accident : त्रिभुवनवाडी फाट्यावर एसटीची दुचाकीला धडक; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Accident : त्रिभुवनवाडी फाट्यावर एसटीची दुचाकीला धडक; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

0
Accident : त्रिभुवनवाडी फाट्यावर एसटीची दुचाकीला धडक; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
Accident : त्रिभुवनवाडी फाट्यावर एसटीची दुचाकीला धडक; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Accident : पाथर्डी : नगर–पाथर्डी राष्ट्रीय महामार्ग (Nagar–Pathardi National Highway) ६१ वरील त्रिभुवनवाडी फाटा येथे गुरुवारी सायंकाळी सुमारे ८ वाजता एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने देवराई येथील तुळशीराम भगवान पालवे (वय ४८) यांचा जागीच मृत्यू (Death) झाला.

Accident : त्रिभुवनवाडी फाट्यावर एसटीची दुचाकीला धडक; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
Accident : त्रिभुवनवाडी फाट्यावर एसटीची दुचाकीला धडक; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

नक्की वाचा : नेवाशात माऊलींच्या मंदिरामागे वाळू चोरी, पोलिसांच्या छाप्यात एकाला अटक

अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून पसार

पालघर डेपोची पालघर–पाथर्डी बस नगरहून पाथर्डीकडे येत असताना हा अपघात (Accident) झाला. धडकेनंतर दुचाकीसह पालवे यांना सुमारे ५० फूट फरपटत नेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून पसार झाला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी (Accident)

घटनेची माहिती मिळताच करंजी पोलीस चौकीचे पोलीस हवालदार अल्ताफ शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डी येथे पाठविण्यात आला. पालवे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, त्रिभुवनवाडी फाटा येथे वारंवार अपघात होत असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.