Ashadhi Vari : अहिल्यानगर ते पंढरपूर सायकल वारी; श्रद्धा, आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश देणारी अनोखी दिंडी

0
Ashadhi Vari : अहिल्यानगर ते पंढरपूर सायकल वारी; श्रद्धा, आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश देणारी अनोखी दिंडी
Ashadhi Vari : अहिल्यानगर ते पंढरपूर सायकल वारी; श्रद्धा, आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश देणारी अनोखी दिंडी

Ashadhi Vari : नगर : अहिल्यानगर सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित “अहिल्यानगर ते पंढरपूर सायकल वारी” या दोन दिवसीय सायकल दिंडीचे आयोजन ११ व १२ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे. यंदा या उपक्रमाचे ८वे वर्ष असून, विठ्ठल भक्ती, निरोगी जीवनशैली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

नक्की वाचा : श्रीकांत दोंदे हत्येप्रकरणी विविध संघटना आक्रमक; राहुरी विद्यापीठासमोर रास्ता रोको

विठुरायाच्या चरणी नतमस्तक

या सायकल वारीमध्ये सहभागी होणारे सायकलपटू अहिल्यानगर ते पंढरपूर असा प्रवास सायकलवरून पूर्ण करून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. “फिटनेससोबत भक्ती” हा संदेश देत हा उपक्रम दरवर्षी अधिक व्यापक होत असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सायकलचा वापर वाढवून प्रदूषणमुक्त आणि निरोगी समाज घडवण्याचा संदेशही या माध्यमातून दिला जाणार आहे. सायकल वारी हे आरोग्य, शिस्त, सहनशक्ती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक बनत आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांचे सहकार्य (Ashadhi Vari)

या उपक्रमासाठी I Love Nagar, Maratha Cycle Center, Bike Tech Point आणि नरेंद्र लोढा यांचे सहकार्य लाभले आहे. अहिल्यानगर सायकलिस्ट असोसिएशनने सर्व सायकलप्रेमी, विठ्ठल भक्त आणि नागरिकांना या प्रेरणादायी उपक्रमाला शुभेच्छा देण्याचे तसेच सहभागी होऊन सायकल संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.