Crime : कोपरगावात दिवसाढवळ्या घरफोडी; तीन फ्लॅट फोडले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

0
Crime : कोपरगावात दिवसाढवळ्या घरफोडी; तीन फ्लॅट फोडले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Crime : कोपरगावात दिवसाढवळ्या घरफोडी; तीन फ्लॅट फोडले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Crime : नगर : कोपरगाव शहरातील साईसिटी परिसरातील साई रेसिडेन्सी येथे दिवसाढवळ्या घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवार, ९ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. चोरट्यांनी इमारतीमधील तीन फ्लॅटचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला, तर चौथा फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न केला. या धाडसी चोरीमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

नक्की वाचा : श्रीकांत दोंदे हत्येप्रकरणी विविध संघटना आक्रमक; राहुरी विद्यापीठासमोर रास्ता रोको

संशयितांचा पाठलाग, कारमधून पसार

साई रेसिडेन्सीमधील एका सफाई कर्मचाऱ्याला इमारतीतून दोन अनोळखी व्यक्ती बाहेर पडताना दिसल्या. त्याने तातडीने येथील रहिवासी तथा माजी सैनिक जगझाप आणि विकास आघाव यांना याची कल्पना दिली. संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत असल्यासारख्या वाटत असल्याने जगझाप व आघाव यांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला. मात्र, संशयित आरोपी एका कारमध्ये बसून वेगाने पसार झाले.दोघांनी इमारतीत परत येऊन पाहिले असता, तीन फ्लॅटचे दरवाजे फुटलेले दिसले. चोरट्यांनी घरातील सामानाची मोठी उचकापाचक केली होती. या इमारतीत अनेक फ्लॅटमध्ये भाडेकरू राहतात.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलिसांकडून पंचनामा आणि तपास सुरू (Crime)

घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधला. ११२ पथकाचे पोलीस कर्मचारी अनिस शेख यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून प्राथमिक पाहणी केली. यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर आणि पोलीस कॉन्स्टेबल सुबे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेत आहेत. या चोरीत नेमका किती मुद्देमाल गेला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.