Nashik-Pune Railway Line : नाशिक- पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी नऊ ऑगस्टला जनआंदोलन : सत्यजित तांबे

महायुतीचे सरकार आल्यानंतर या सरळ मार्गामध्ये राजकारण

0
Nashik-Pune Railway Line : नाशिक- पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी नऊ ऑगस्टला जनआंदोलन : सत्यजित तांबे
Nashik-Pune Railway Line : नाशिक- पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी नऊ ऑगस्टला जनआंदोलन : सत्यजित तांबे

Nashik-Pune Railway Line : संगमनेर : मुंबई नाशिक पुणे गोल्डन ट्रँगल (Mumbai-Nashik-Pune Golden Triangle) वरील अत्यंत महत्त्वाचा असलेल्या आणि उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा नाशिक- पुणे रेल्वे मार्ग (Nashik-Pune Railway Line) हा संगमनेर या सरळ मार्गेच व्हावा या आग्रही मागणीसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या निमित्ताने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी दिली असून या जनआंदोलनात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या एकजुटीने आवाज उठवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

नक्की वाचा : कर्जतचे सहायक निबंधक लाचलुचपतच्या जाळ्यात; १० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

रेल्वेमार्गासाठी सातत्याने पाठपुरावा

नाशिक – पुणे सरळ रेल्वे महामार्गाबाबत महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. हा रेल्वे मार्ग सरळ व्हावा याकरता सर्वप्रथम मा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी २००० मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र दिले होते. यानंतर या रेल्वेमार्गासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.यानुसार कार्यवाही सुरू झाली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

महायुतीचे सरकार आल्यानंतर या सरळ मार्गामध्ये राजकारण (Nashik-Pune Railway Line)

महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये या कामाला अत्यंत वेग आला. नाशिक, सिन्नर ,संगमनेर, जुन्नर ,नारायणगाव, मंचर, खेड ,चाकण, पुणे असा हा सरळ आणि नैसर्गिक रेल्वे मार्ग आहे. याकरता भूसंपादन होऊन सुमारे ६५० कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात करण्यात आले. त्यावेळेस एमएमआरडीचे कोणतेही कारण सरकारने दिले नव्हते. मात्र महाविकास आघाडी सरकार बदलले आणि महायुतीचे सरकार आले आणि या सरळ मार्गांमध्ये राजकारण सुरू झाले. हा मार्ग नाशिक सिन्नर शिर्डी अहिल्यानगर पुणे असा प्रास्तावित केला आहे.

दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा हा रेल्वे मार्ग

ही बातमी कळताच संपूर्ण तालुक्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. कारण हा सरळ रेल्वे मार्ग पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे.या रेल्वे मार्गामुळे तरुणांना नोकरीसाठी पुणे नाशिक याकरता जाता येणार आहे. तर या मार्गावरील शेतकऱ्यांना आपला शेतमाल सहजरीत्या बाहेर पाठवता येणार आहे. याचबरोबर मुंबई पुणे नाशिक या गोल्डन ट्रँगल वरील औद्योगीकरणाच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा हा रेल्वे मार्ग आहे. या विभागाच्या विकासासाठी हा मार्ग महत्त्वाचा असताना बदलावला गेल्या कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकप्रतिनिधींना एकत्र करून बैठक

यानंतर बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन हा मार्ग सरळ मार्गे झालाच पाहिजे हा आग्रह केला. तर आमदार सत्यजित तांबे यांनी या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र करून बैठक घेतली याचबरोबर विधान परिषदेमध्ये सातत्याने आवाज उठवला. जनतेमध्ये जनजागृती करून मोठे आंदोलन उभे करण्यासाठी व्यासपीठ निर्माण केले. मुख्यमंत्री, विविध मंत्री यांच्याबरोबर चर्चा केली. भविष्यातील पिढ्यांच्या समृद्धीसाठी मार्ग असून याकरता एकत्रित लढावा लागणार आहे.

संगमनेर तालुक्यात मोठी नाराजी

मात्र राजकीय हेतू ठेवून संगमनेर चे नवीन लोकप्रतिनिधी सुरुवातीला रेल्वे पळवण्याची टिंगल करत होते .मात्र खरोखर रेल्वे पळवल्याने आता ते सोयीस्कर रित्या गप्प बसून आहेत. यावर संगमनेर तालुक्यात मोठी नाराजी निर्माण झाली. तर सोशल माध्यमांमधून त्यांच्यावर प्रचंड टीका झाली आहे. तर काहींनी अकोले व संगमनेर तालुक्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र संगमनेर व अकोले तालुका हे भाऊ भाऊ असून यामध्ये कायम एकजूट आहे.

रास्ता रोको करण्यात येणार

दोन्ही तालुके विकासाकरता एकमेकांना सहाय्य करत असून अकोले व संगमनेर एकच असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.रेल्वे करता महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, लोकसभेतील खासदार डॉ.अमोल कोल्हे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सत्यजित तांबे,मा.आ.डॉ.सुधीर तांबे, यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या निमित्ताने समृद्धी महामार्ग व नाशिक पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्यात येणार आहे.

आपल्या सर्वांना लढावे लागणार

त्यामुळे या जनआंदोलनामध्ये सर्व विद्यार्थी युवक नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व आपला एकत्रीत आवाज केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत पोहोचून ही रेल्वे स्थळ मार्गीच व्हावी याकरता आपल्या सर्वांना लढावे लागणार आहे त्यामुळे सर्वांनी या मोठ्या जन आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आग्रही आवाहन नाशिक पुणे रेल्वे कृती समिती, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा व पुणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.