ACB : कर्जतचे सहायक निबंधक लाचलुचपतच्या जाळ्यात; १० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

उर्वरित रकमेसाठी सातत्याने तगादा

0
ACB
ACB

ACB : कर्जत : जिल्हा बँकेच्या (District Bank) निवडणुकीसंदर्भातील ठरावाची तक्रार दाबून टाकण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कर्जतचे सहायक निबंधक मिलिंद प्रल्हाद राऊत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने १० हजार रुपयांची लाच (Bribery) स्वीकारताना रंगेहात पकडले.

नक्की वाचा : मलाला युसुफझाईच्या प्रेरणेतून स्नेहालयाचा अभिनव उपक्रम; निघोजमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

उर्वरित रकमेसाठी सातत्याने तगादा

तक्रारदार कर्जत तालुक्यातील एका विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आवश्यक ठराव संचालक मंडळाने मंजूर केला होता. मात्र एका संचालकाने त्या ठरावावर आक्षेप घेत सहाय्यक निबंधकांकडे तक्रार दाखल केली. ही तक्रार निकाली काढून ठरावाला अडथळा येऊ न देण्यासाठी कर्जतचे सहायक निबंधक मिलिंद राऊत यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यापैकी १० हजार रुपये आधीच घेतल्यानंतर उर्वरित रकमेसाठी सातत्याने तगादा लावला जात होता. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गुन्हा दाखल (ACB)

अखेर त्रस्त झालेल्या तक्रारदाराने ९ जुलै रोजी अहिल्यानगरच्या लाच लुचपत विभागकड़े तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी करून शुक्रवारी (ता. १०) रोजी सापळा रचला. तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने सहाय्यक निबंधक मिलिंद राऊत यांना जागीच ताब्यात घेतले. या प्रकरणी  कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सविता तांबे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर हे करीत आहेत.