Vruddheshwar Cooperative Sugar Factory : वृद्धेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा आप्पासाहेब राजळे तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब किलबिले 

मतदानापूर्वीच १९ पैकी १७ जागा बिनविरोध

0
Vruddheshwar Cooperative Sugar Factory : वृद्धेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा आप्पासाहेब राजळे तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब किलबिले
Vruddheshwar Cooperative Sugar Factory : वृद्धेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा आप्पासाहेब राजळे तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब किलबिले

Vruddheshwar Cooperative Sugar Factory : पाथर्डी : तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (Vruddheshwar Cooperative Sugar Factory) अध्यक्षपदी माजी आमदार आप्पासाहेब राजळे (Appasaheb Rajale), तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब किलबिले (Babasaheb Kilbile) यांची शनिवारी (ता. ११) बिनविरोध निवड करण्यात आली. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. उद्धव नाईक यांच्या उपस्थितीत कारखान्याच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली.

नक्की वाचा : नाशिक- पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी नऊ ऑगस्टला जनआंदोलन : सत्यजित तांबे

मतदानापूर्वीच १९ पैकी १७ जागा बिनविरोध

पाथर्डी तालुक्याची ‘कामधेनू’ म्हणून ओळख असलेल्या वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानापूर्वीच पॅनेलच्या १९ पैकी १७ जागा आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखालील बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीतही राजळे गटाने विजय मिळवून सर्व १९ संचालक जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते.या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. ११) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी माजी आमदार आप्पासाहेब राजळे आणि उपाध्यक्षपदासाठी बाबासाहेब किलबिले यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी दोघांकडे कारखान्याच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पुन्हा एकदा अनुभवी नेतृत्वावर विश्वास (Vruddheshwar Cooperative Sugar Factory)

यापूर्वीच्या कार्यकाळातही आप्पासाहेब राजळे यांनी अध्यक्ष, तर रामकिसन काकडे यांनी उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. नव्या संचालक मंडळाने पुन्हा एकदा अनुभवी नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत अध्यक्षपदी राजळे यांची निवड केली असून उपाध्यक्षपदी बाबासाहेब किलबिले यांना संधी दिली आहे.यावेळी आमदार तथा कारखान्याच्या संचालिका मोनिका राजळे, ज्येष्ठ संचालक उद्धव वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा संचालक राहुल राजळे, सुभाष ताठे, अनिल फलके, श्रीकांत मिसाळ, नारायण काकडे, रामकिसन काकडे, सुभाष बुधवंत, यशवंतराव गवळी, सुरेश आठरे, शेषराव ढाकणे, बाळासाहेब गोल्हार, काकासाहेब शिंदे, सिंधूबाई जायभाय, बापूसाहेब पाटेकर, संदीप लोखंडे हे संचालक उपस्थित होते.