Murder : हॉटेल व्यवसायिकाचा कोयत्याने वार करून खून; श्रीरामपूर शहरात भरदिवसा घडला थरार

जेवणाच्या बिलावरून वेटरशी आरोपींचा वाद

0
Murder : हॉटेल व्यवसायिकाचा कोयत्याने वार करून खून; श्रीरामपूर शहरात भरदिवसा घडला थरार
Murder : हॉटेल व्यवसायिकाचा कोयत्याने वार करून खून; श्रीरामपूर शहरात भरदिवसा घडला थरार

Murder : श्रीरामपूर : शहरातील नेवासा रोडवरील (Nevasa Road) हॉटेल लक्ष्मीनारायणचे चालक-मालक आकाश शेखर दुबैय्या/ वेंकटरामन यांचा त्यांच्या हॅाटेलमध्येच संशयित आरोपी सुरेश सतीश जाधव (रा. खिलारी वस्ती, श्रीरामपूर) व त्यांच्या साथीदारांनी कोयत्याने (Sickle) वार करून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची चर्चा असून खरे कारण पोलीस तपासातच पुढे येणार आहे.  

नक्की वाचा : जुन्या वादातून तरुणावर तलवारीने हल्ला; श्रीगोंदा येथील घटना

जेवणाच्या बिलावरून वेटरशी आरोपींचा वाद

या हल्ल्यात आकाश दुबैय्या यांचा जागेवरच मृत्यू झाला.आज (ता.११) दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान सुरुवातीला जेवणाच्या बिलावरून वेटरशी आरोपींचा वाद झाला होता. त्यात हॉटेलचे मालक आकाश यांनी मध्यस्थी करत जेवणाचे सर्व बिल देण्यास सांगितले. त्याचा राग येऊन जेवणाऱ्यांपैकी एकाने आकाश यांच्या डोक्यात कोयत्याने वार करत त्यांना जखमी केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट (Murder)

यावेळी आकाश यांच्या मदतीला आलेल्यांवरही आरोपींनी हल्ला केला. आकाश दुबैय्या यांना साखर कामगार रुग्णालयात नेले असता प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॅा.रवींद्र जगधने यांनी त्यांना मयत घोषित केले. दरम्यान या हत्येचे कारण अजूनपर्यंत स्पष्ट झालेले नाही.