Ahilyanagar Municipal Corporation : वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांवर कारवाई…मनपाने दिला इशारा

0
Ahilyanagar Municipal Corporation : वाहतुकीस अडथळा ठरणारे धार्मिक स्थळांवर कारवाई…मनपाने दिला इशारा
Ahilyanagar Municipal Corporation : वाहतुकीस अडथळा ठरणारे धार्मिक स्थळांवर कारवाई…मनपाने दिला इशारा

Ahilyanagar Municipal Corporation : नगर- अहिल्यानगर शहरामध्ये दिवसं-दिवस वाढत्या वाहतूक कोंडीमुळे (Traffic Jam) सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आता अहिल्यानगर महानगरपालिकेने (Ahilyanagar Municipal Corporation) पुढाकार घेतला असून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या व रस्त्याच्या मध्ये किंवा रस्त्याच्या कडेला असलेले मंदिरे, धार्मिक स्थळे व वास्तु हे हटविले जाणार असून संबंधिताने ते तातडीने स्थलांतरित करावे, अन्यथा पालिका त्यावरती कायदेशीर कारवाई करेल असा इशारा देखील अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.

मनपाचा सार्वजनिक इशारा

अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिक, धर्मदाय संस्था, मंदिर ट्रस्ट, धार्मिक संस्था इत्यादींना जाहीर आवाहन केले आहे की, महानगरपालिकेच्या हद्दीतील विशेष करून रस्त्यामध्ये वा रस्त्याच्या कडेला पदपथावर मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, दर्गा, मझार, कबर इत्यादी असल्यामुळे वाहतुकीस नागरिकांस, शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, अग्निशामन व रुग्णवाहिका तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना अडथळे निर्माण होत आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

रस्त्यावरील अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे हटवणार (Ahilyanagar Municipal Corporation)

अहिल्यानगर शहरातील वाढती लोकसंख्या व वाहने इत्यादीचा विचार करता रस्त्यावरील अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे हटविण्याचे निष्कषित करण्यात आले असून, तसेच ते चिन्हांकीत करण्याची कारवाई हाती घेण्यात येणार आहे. तरी संबंधितांना याबाबतच्या नोटीसा बजावण्यात आल्या असून, नोटीस बजावल्यापासून सात दिवसाच्या आत संबंधित अतिक्रमण काढून घ्यावेत तसेच ते स्थलांतरित करावे. अन्यथा सदरील धार्मिक स्थळे बेकायदेशीर अतिक्रमन आहे असे समजून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा मनपाचे आयुक्त यांनी जाहीर नोटीसद्वारे दिला आहे.

नगर शहरांमध्ये ठिकठिकाणी चौकामध्ये तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांमध्ये सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना नगरकरांना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी शहरातील मुख्य रस्त्यांवर मधोमध धार्मिक स्थळे असल्याने वाहतुकीस अडथळा तयार होतो. याबाबत यापूर्वी कारवाई देखील करण्यात आली होती. मात्र गेल्या अनेक वर्षांमध्ये पुन्हा त्या कारवाया थंडावल्या होत्या, वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसें -दिवस वाढत चालली आहे.