Monsoon : मान्सून पुन्हा बरसणार; महाराष्ट्रासह देशातील 17 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

0
Monsoon : मान्सून पुन्हा बरसणार; महाराष्ट्रासह देशातील 17 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
Monsoon : मान्सून पुन्हा बरसणार; महाराष्ट्रासह देशातील 17 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

Monsoon : नगर : मान्सून पुन्हा एकदा जोरदार सक्रिय झाला असून महाराष्ट्रासह देशातील १७ राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या पोषक हवामानामुळे विजांच्या कडकडाटासह धो-धो पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : हॉटेल व्यवसायिकाचा कोयत्याने वार करून खून; श्रीरामपूर शहरात भरदिवसा घडला थरार

मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने देशातील 14 राज्यांना वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचे इशारा दिला आहे पुढील 12 तासांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 75 किलोमीटर पोहोचण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देखील जारी करण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

महाराष्ट्रात पुन्हा सक्रिय होणार (Monsoon)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या हरियाणा उत्तर प्रदेश पासून मनिपुर पर्यंत मान्सूनचा पट्टा विस्तारलेला आहे. त्याचबरोबर उत्तर बांगलादेश आणि लगतच्या भागांवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असल्याने पुढील दोन ते तीन दिवसात ईशान्य भारत पश्चिम बंगाल आणि बिहार मधील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवसात पूर्व उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या सर्व वातावरणाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील काहीशी विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा एकदा बरसणार आहे.