School veranda collapsed : अकोले : शहरातील माळीझाप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या (Zilla Parishad Primary School) इमारतीची लोखंडी पत्र्यांची संपूर्ण पडवी शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कोलमडून पडली (School veranda collapsed) . शाळेला दुपारी सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला.
बांधकाम जीर्ण झाल्याने पडवी कोलमडली
शाळेची इमारत व पडवी जीर्ण झाल्याने दुरुस्तीचा प्रस्ताव आहे. या इमारतीत दोन खोल्या असून, एकात प्राथमिक शाळेचा वर्ग भरतो, तर दुसऱ्यात बनकर वस्तीची अंगणवाडी भरते. दरम्यान, शनिवारी शाळा सुटल्यावर दोन व्यक्ती कामानिमित्त पडवीवर चढल्या होत्या. बांधकाम जीर्ण झाल्याने त्यांचा भार न पेलवल्याने पडवी एका बाजूने कोलमडून पडली. सुदैवाने यात कुणाला दुखापत झाली नाही यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी पडवीचे पत्रे, खांब बाजूला सुरक्षित ठेवले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
लहामटे यांचे आर्थिक मदत देण्याचे आश्वासन (School veranda collapsed)
सायंकाळी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी त्यांच्यासमोर शाळेला निधी व जागेची समस्या असल्याचे सांगितले. यावर लहामटे यांनी शाळेच्या इमारतीला भरीव आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी अक्षय आभाळे प्रमोद मंडलिक, मनोज गायकवाड शांताराम मंडलिक, गुलाब मंडलिक, उदय मंडलिक, एकनाथ मंडलिक, रंजना अभंग उपस्थित होते.



