Local Crime Branch : तोफखाना हद्दीतील चैनस्नॅचिंगचा गुन्हा उघड; रेकॉर्डवरील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला जेरबंद

Local Crime Branch : तोफखाना हद्दीतील चैनस्नॅचिंगचा गुन्हा उघड; रेकॉर्डवरील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला जेरबंद

0
Local Crime Branch : तोफखाना हद्दीतील चैनस्नॅचिंगचा गुन्हा उघड; रेकॉर्डवरील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला जेरबंद
Local Crime Branch : तोफखाना हद्दीतील चैनस्नॅचिंगचा गुन्हा उघड; रेकॉर्डवरील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला जेरबंद

Local Crime Branch : नगर : तोफखाना पोलीस ठाण्याच्या (Tofkhana Police Station) हद्दीत घडलेल्या चैनस्नॅचिंगच्या (Chain-snatching) गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) अवघ्या काही दिवसांत छडा लावत रेकॉर्डवरील आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ३२ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सागर रमेश नागपुरे (वय ३३, रा. सावतानगर, भिंगार, अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

सावेडी परिसरातील मंगळसूत्र हिसकावून पलायन

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सावेडी परिसरातील अनंत विहार, शिवम कॉलनी येथे राहणाऱ्या मानसी जीवन महाजन या रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले होते. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गुप्त माहितीदारांच्या मदतीने आरोपीचा माग (Local Crime Branch)

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात आला.
तपासादरम्यान आरोपी सागर रमेश नागपुरे (वय ३३, रा. सावतानगर, भिंगार, अहिल्यानगर) हा पुण्यातील कोथरूड परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ पुण्यात जाऊन सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.


आरोपीकडून ६२ हजार १९० रुपये रोख तसेच गुन्ह्यात वापरलेली सुमारे ७० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. असा एकूण १ लाख ३२ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


चौकशीत आरोपीने तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एका चैनस्नॅचिंगच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे २०२५ मधील तत्सम गुन्हाही उघडकीस आला आहे. ताब्यात घेतलेला संशयित आरोपी सागर नागपुरे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहिल्यानगर जिल्ह्यात जबरी चोरी, चोरी, दुखापत, शस्त्र बाळगणे आदी स्वरूपाचे अनेक गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.