Nagar : ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रमातून प्रशासनाचा विद्यार्थ्यांबरोबर सुसंवाद

0
Nagar : 'अमृत संवाद सेतू' उपक्रमातून प्रशासनाचा विद्यार्थ्यांबरोबर सुसंवाद
Nagar : 'अमृत संवाद सेतू' उपक्रमातून प्रशासनाचा विद्यार्थ्यांबरोबर सुसंवाद

Nagar : नगर : युवक-युवतींना शासकीय कार्यालयीन कामकाजाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, प्रशासनाची कार्यपद्धती समजावी, प्रशासन व नागरिक यांच्यात विश्वासाचे नाते दृढ व्हावे, या उद्देशाने ‘अमृत’ संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी अहिल्यानगर तहसील कार्यालयाला भेट देऊन महसूल प्रशासनाच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. यावेळी तहसीलदार स्वप्नील ढवळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शासकीय कार्यालयांविषयीची अनाठायी भीती मनातून दूर करून प्रशासनाशी सकारात्मक संवाद ठेवण्याचे आवाहन केले.

नक्की वाचा : जुन्या वादातून तरुणावर तलवारीने हल्ला; श्रीगोंदा येथील घटना

प्रशासन हे नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असून शासनाच्या विविध योजना आणि सेवा प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यात प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची आहे. प्रशासन आणि युवक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणाऱ्या ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रम कौतुकास्पद आहे. युवकांना लोकाभिमुख प्रशासनाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी तसेच प्रशासनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे श्रीमती ढवळे यांनी नमूद केले. उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातील आवक-जावक विभाग, महसूल शाखा, विविध शासकीय दाखले मंजुरी प्रक्रिया तसेच लेखा विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली. कार्यालयीन दैनंदिन कामकाज, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.

नक्की वाचा : जुन्या वादातून तरुणावर तलवारीने हल्ला; श्रीगोंदा येथील घटना

‘अमृत’ संस्थेचे आभार (Nagar)

अधिकारी श्रद्धा पारगावकर यांनी महसूल विभागाच्या विविध कामकाजाची माहिती देत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. या संवादातून विद्यार्थ्यांच्या मनातील विविध शंकांचे निरसन होऊन शासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत त्यांची समज अधिक व्यापक झाली. अभ्यास दौऱ्यात ‘अमृत’ संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे, अमृत मित्र वैभव कुलकर्णी, शरद क्षीरसागर, संदीप देशपांडे, गौरी कुलकर्णी, सुजल झुंजारे, अर्चना बनकर, वर्षा सागडे तसेच विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी ‘अमृत’ संस्थेचे आभार व्यक्त केले. प्रशासनाशी विश्वासाचे नाते दृढ करण्यास आणि युवकांना लोकाभिमुख प्रशासनाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.