Loan waiver : कर्जमुक्तीची व्याप्ती वाढली; दोन लाखांचे कर्ज सर्व पात्र शेतकऱ्यांना माफ

0
Loan waiver : कर्जमुक्तीची व्याप्ती वाढली; दोन लाखांचे कर्ज सर्व पात्र शेतकऱ्यांना माफ
Loan waiver : कर्जमुक्तीची व्याप्ती वाढली; दोन लाखांचे कर्ज सर्व पात्र शेतकऱ्यांना माफ

Loan waiver : नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ आणखी अधिक समावेशक करण्याची मोठी घोषणा केली आहे. यामधील मुख्य सुधारणा म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले योजनेत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवरील ५० हजार रुपयांची मर्यादा पूर्ण रद्द करण्यात अली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

लाभार्थींची संख्या वाढणार

त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ मध्ये नवीन कर्ज घेण्याची अट रद्द आणि दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असल्यासही दोन लाखांपर्यंतची रक्कम माफ कर्मयचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे. नव्या बदलांमुळे लाभार्थींची संख्या आणखी वाढणार. शासनाने बँकांच्या (राष्ट्रीयीकृत, सहकारी व खासगी) डेटाच्या आधारे पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे.

नक्की वाचा : जुन्या वादातून तरुणावर तलवारीने हल्ला; श्रीगोंदा येथील घटना

शेतकरी कुटुंबांसाठी नवी आशा (Loan waiver)

योजनेचा उद्देश केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा आहे. शेतकरी हिताच्या इतर योजना राबविण्यात येणार असून यामध्ये कृषी वीज सबसिडी, कापूस-सोयाबीन खरेदी, ठिबक सिंचन, हमीभाव यांचा समावेश आहे. ही योजना महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कुटुंबांसाठी नवी आशा निर्माण करणारी ठरली आहे.