MCOCA : दुबैय्या यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय बेमुदत बंद सुरुच; गुन्हेगारांवर मोक्का लावण्याची मागणी

पाठीराख्यांना कडक शासन करण्याचे आश्वासन

0
MCOCA : दुबैय्या यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय बेमुदत बंद सुरुच; गुन्हेगारांवर मोक्का लावण्याची मागणी
MCOCA : दुबैय्या यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय बेमुदत बंद सुरुच; गुन्हेगारांवर मोक्का लावण्याची मागणी

MCOCA : श्रीरामपूर : शहरातील युवा उद्योजक आकाश शेखर दुबैय्या (Akash Dubaiyya), यांचा शनिवारी (ता. ११) दिवसाढवळ्या खून (Murder) झाला होता. या हत्येच्या निषेधार्थ आज  (ता. १३  रोजी सलग दुसऱ्या दिवशीही व्यापारी, व्यावसायिक व सर्वपक्षीयांच्या वतीने श्रीरामपूर बेमुदत बंद (Indefinite Closure) सुरू ठेवण्यात आला आहे.

नक्की वाचा : सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार : डॉ. सुजय विखे

गुन्हेगारीचा बिमोड करण्याची मागणी

या बंद मध्ये सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते,सर्व व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत. श्रीरामपूरला वेठीस धरणाऱ्या संघटित गुन्हेगारांच्या आकावर मोक्का लावावा अशी मागणी लोकप्रतिनिधींनी पोलिसांकडे केली आहे. सर्वपक्षीयांच्या वतीने श्रीरामपूर शहर बेमुदत बंदची हाक देण्यात आली होती. त्यास व्यापारी वर्गाने प्रतिसाद देत आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत गुन्हेगारीचा बिमोड करण्याची मागणी केली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पाठीराख्यांना कडक शासन करण्याचे आश्वासन (MCOCA)

सर्व व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक यांनी या बेमुदत बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. दरम्यान रविवारी (ता.१२) सकाळी ११ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हॉटेल व्यवसायिक (आकाश शेखर दुबैय्या,वय ३५) यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. यावेळी दुबैय्या परिवाराला १०० टक्के न्याय मिळेल आणि आरोपी व त्याच्या पाठीराख्यांना कडक शासन होईल,असे आश्वासन त्यांनी दिले.