Chess Tournament : नगर : शहरातील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय येथे शुक्रवारी (ता. १७) तिसरी नरेंद्रजी फिरोदिया चषक (Narendraji Firodia Trophy) अखिल भारतीय सतराशे पेक्षा कमी मानांकित खेळाडूंसाठी बुद्धिबळ स्पर्धा (Chess Tournament) आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी (Narendra Kulkarni) यांनी दिली.
तीसऱ्यांदा या स्पर्धेचे आयोजन
या स्पर्धेत भारतातून खेळाडू बुद्धिबळ खेळण्यासाठी येणार असून आत्तापर्यंत गुजरात, आंध्र प्रदेश, गोवा, तमिळनाडू, तेलंगाना इत्यादी राज्यातून तीनशे पेक्षा जास्त खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. लवकरच येणारा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तसेच गुरुपौर्णिमा याचे औचित्य साधून वरील स्पर्धा आयोजित केली आहे. नरेंद्र फिरोदिया यांनी आजपर्यंत बुद्धिबळासाठी दिलेल्या योगदानाला वंदन म्हणून त्यांच्या नावाची ही तीसऱ्यांदा स्पर्धा आयोजित होत आहे असे अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी सांगितले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
बुद्धीचे बळ लागणार पणाला (Chess Tournament)
साडेचार वर्षाचा बाल खेळाडू तसेच ८३ वर्षाचे वयस्कर खेळाडू सुद्धा यात आपल्या बुद्धीचे बळ पणाला लावणार आहेत. शुक्रवारी (ता. १७) सकाळी दहा वाजता या स्पर्धचा शुभारंभ होणार असून, या स्पर्धेत एकूण ९ फेऱ्या होणार आहेत. रविवारी (ता. १९) दुपारी चार वाजता तिसऱ्या नरेंद्र फिरोदिया चषक बुद्धिबळ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. या स्पर्धेत विविध गटात पाच लाख रुपयांची प्रोत्साहन पर रोख बक्षिसे, आकर्षक ७० करंडक व सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहेत.
भारतात पहिल्यांदाच १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लाकडी पटांचा वापर
या स्पर्धेचे प्रमुख पंच प्रवीण ठाकरे (जळगाव) हे असून त्यांना पवन राठी (पुणे), शार्दुल टापसे (सातारा), दीपक चव्हाण (वाशिम), शिशिर इंदुरकर ( नागपूर), प्रशांत घगेकर, देवेंद्र ढोकळे (नगर) आदी सहायक पंच म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. ही स्पर्धा जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या नियमावली नुसार होणार आहे. या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे १०० लाकडी पट व सोंगट्या हे असणार आहे. १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लाकडी पटांचा वापर भारतात पहिल्यांदा होणार आहे.
खेळाडूंना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सदस्य सुबोध ठोंबरे, परूनाथ ढोकळे, शाम कांबळे, मनीष जसवानी, प्रकाश गुजराती, चेतन कड, सचिन कांबळे (पाथर्डी), शिवा काळे (श्रीरामपूर), दुर्गा ढोकळे (शेवगाव), संकेत गाडे (कोपरगाव), संजय खडके, नवनीत कोठारी, दत्ता घाडगे, अतुल कोठारी, शुभदा ठोंबरे, डॉ. स्मिता वाघ, रोहिणी आडकर आदी प्रयत्नशील आहेत. अहिल्यानगर शहरातील बुद्धिबळ चाहत्यांनी, खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे तसेच वरील स्पर्धेत भाग घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी यशवंत बापट ९३२६०९२५०१ व पारूनाथ ढोकळे ९८५०७०४२६८ या क्रमांकावर संपर्क आवाहन केले आहे.



