
Ahilyanagar to get an additional Lok Sabha constituency. : नगर : लोकसभेच्या मतदारसंघ फेररचनेसाठी (Delimitation of Lok Sabha Constituencies) विरोधकांना राजी करण्यासाठी सर्व राज्यांत 50 टक्के जागा वाढीचा तोडगा पुढे आला आहे. यावर सध्या चर्चा सुरू असल्याचे आढळून येते. तसे झाले तर महाराष्ट्रात 48 ऐवजी 72 लोकसभा मतदारसंघ होतील. लोकसंख्येचे प्रमाण आणि विस्तार लक्षात घेता याही परिस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्यात एक लोकसभा मतदारसंघ वाढणार (Ahilyanagar to get an additional Lok Sabha constituency) आहे. त्यामुळे जिल्ह्यात तीन खासदार (Member of Parliament) होतील.
नक्की वाचा : जन्म, मृत्यूच्या दाखल्यांसाठी नागरिकांचे हेलपाटे!; महापालिका प्रशासनाचा सावळा गोंधळ
दक्षिण राज्यांच्या जागा कमी होऊन उत्तरेच्या वाढतील असा आक्षेप
या विधेयकाला विरोध होत आहे. दक्षिणेतील अनेक राज्यांतील जागा कमी होतील, तर उत्तरेच्या राज्यात जागा वाढतील, असा विरोधकांचा प्रमुख आक्षेप आहे. यावर तोडगा म्हणून सर्वच राज्यात समान वाढ करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. त्यानुसार प्रत्येक राज्यात सध्याच्या 50 टक्के जागा वाढवायच्या असा हा प्रस्ताव आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून विरोधकांसमोर हा मुद्दा मांडल्याचे सांगण्यात येते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अंदाजानुसार जिल्ह्याची लोकसंख्या ५५ लाखांच्या पार (Ahilyanagar to get an additional Lok Sabha constituency)
असे झाले तर राज्यात 72 खासदार होतील. त्यातील 3 राखीव आणि 33 टक्के महिला आरक्षण सोडले तरी 48 मतदारसंघ खुले राहणार आहेत, असे गणितही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे गणित लक्षात घेतले तर जिल्ह्यात एक जागा वाढणार आहे. देशात सध्या 20 लाखापर्यंत लोकसंख्येचा एक मतदारसंघ आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ४५.४ लाख होती. २०११ पासून देशात जनगणनेचे अधिकृत आकडे जाहीर झालेले नसले तरी, २०२६ मधील अंदाजानुसार जिल्ह्याची लोकसंख्या ५५ लाखांच्या पार गेली आहे. जर एका मतदारसंघासाठी आदर्श लोकसंख्या १५ लाख धरली तरी तीन मतदारसंघ करावे लागणार आहेत.
अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. येथील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचे अंतर खूप जास्त असल्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय दृष्ट्या दोन खासदारांना संपूर्ण जिल्ह्यावर लक्ष ठेवणे कठीण जाते. हाही एक निकष राहणार आहे.
जिल्ह्यात एकूण १२ विधानसभा मतदारसंघ आहेत. सध्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा क्षेत्र येतात. संसदेच्या जागा वाढल्यास, हे विभाजन बदलून प्रत्येकी चार विधानसभा मतदारसंघ मिळून एक लोकसभा मतदारसंघ अशी रचना होऊ शकते. सध्या जिल्हा उत्तर आणि दक्षिण अशा दोन भागात विभागला गेला आहे. कोपरगाव, शिर्डी, श्रीरामपूर, अकोले, संगमनेर, नेवासा यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघ तर शेवगाव, राहुरी, पारनेर, अहिल्यानगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड यांचा नगर लोकसभा मतदारसंघ अशी रचना आहे.
भविष्यात जर तिसरा मतदारसंघ अस्तित्वात आला, तर तो ‘मध्य अहमदनगर’ असू शकतो. संगमनेर-राहुरी-पारनेर पट्टा किंवा नेवासा-शेवगाव परिसर जोडून तो तयार केला जाऊ शकतो. संसदेने नवीन मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा निर्णय अद्याप पूर्णपणे लागू केलेला नाही. परंतु, देशात जेव्हा कधी नवीन जनगणना आणि मतदारसंघ फेररचना प्रक्रिया सुरू होईल.


