
Karjat Nagar Panchayat : कर्जत : कर्जत नगरपंचायतीमध्ये (Karjat Nagar Panchayat) पदाधिकारी बदलाची प्रक्रिया सुरू असून शुक्रवारी (ता.१०) नगराध्यक्षापदी छाया शेलार यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर १३ नगरसेवकांनी तात्काळ उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रेंवर (Santosh Mehetre) देखील अविश्वास दाखल केला होता. त्यावर बुधवारी (ता.१५) कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अक्षय जायभाये यांनी विशेष सभा बोलावली होती. यात संतोष मेहेत्रे यांच्या विरोधात ११ नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. तर सहा नगरसेवक या सभेस गैरहजर राहिले. मुख्याधिकारी जायभाये यांनी सदर बैठकीचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला असून पुढील निर्णय जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) घेणार असल्याची माहिती दिली.
नक्की वाचा : ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करणार : आप्पासाहेब सप्रे
नगरसेवकांची विशेष सभा
कर्जत नगरपंचायतीमध्ये मागील अडीच महिन्यापासून नाट्यमय घडामोडी सुरू आहे. १० जुलै रोजी नूतन नगराध्यक्षा म्हणून छाया शेलार यांची अधिकृत घोषणा झाली. या निवडीचा जल्लोष विधान परिषदेचे सभापती राम शिंदे समर्थकांसह आमदार रोहित पवार समर्थकांनी देखील केला. नगराध्यक्षा निवडीनंतर १३ नगरसेवकांनी तत्काळ विद्यमान उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मुख्याधिकारी अक्षय जायभाये यांच्याकडे दाखल केला. त्या अनुषंगाने मुख्याधिकारी जायभाये यांनी बुधवार, (ता. १५) दाखल उपनगराध्यक्ष प्रस्तावावर सकाळी ११ वाजता कर्जत नगरपंचायतीच्या सभागृहात सर्व १७ नगरसेवकांची विशेष सभा बोलावली होती.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
१७ पैकी ११ च नगरसेवक बैठकीस हजर (Karjat Nagar Panchayat)
यापैकी ११ च नगरसेवक बैठकीस हजर होते. तर घुले समर्थक ४ आणि भाजपाच्या गटातून नॉट-रीचेबल झालेले २ नगरसेवक अनुपस्थित होते. या बैठकीस पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा छाया शेलार यांनी काम पाहिले. या विशेष सभेत संतोष मेहेत्रे यांच्या अविश्वास ठरावाच्या बाजूने उपस्थित असलेले ११ ही नगरसेवकांनी मतदान करीत बहुमताने सदरचा ठरावा पास केला. या विशेष सभेनंतर बोलताना गटनेते सतीश पाटील म्हणाले की, मी एकूण १५ नगरसेवक गटाचा गटनेता असून उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे यांच्यावरील अविश्वास ठराव बैठकीस सर्वानाच उपस्थित राहण्याचा अधिकृत व्हीप देखील जारी केला होता.
मात्र १५ पैकी ६ नगरसेवक या बैठकीस अनुपस्थित राहिले. त्यांच्यावर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे शिस्तभंग यासह अपात्रतेची कार्यवाही करण्यासंबंधी मागणी करणार असल्याचे सांगितले.


