
Gram Panchayat : नगर : नगर- मनमाड रस्त्यावर (Nagar-Manmad Road) असलेल्या नव नागापूर हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा नव नागापूर ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) वतीने देण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी आय लव नगर (I Love Nagar) च्या माध्यमातून या संदर्भात आवाज उठवला होता. या बातमीची दखल घेत नव नागापूर ग्रामपंचायतीने या ठिकाणचा कचरा उचलला असून या ठिकाणी कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
नक्की वाचा : वांगचूक यांच्या उपोषणावरून राजू शेट्टींनी सांगितली अण्णांच्या आंदोलनाची आठवण
नव नागापूर ग्रामपंचायततर्फे नागरिकांना आवाहन
नव नागापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या व्यवसायिक तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की घंटागाडी येत नसेल तर संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा तुमच्या शंकांचे निराकरण करण्यात येईल, असे नव नागापूर ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब सप्रे यांनी केले आहे.तसेच आषाढी एकादशी निमित्त अनेक दिंड्या नगर मनमाड महामार्गावरून पंढरपूर कडे प्रस्थान करत आहे. त्यामुळे वारकऱ्यांना तसेच प्रवाशांना या दुर्गंधीचा नाहा त्रास सहन करावा लागत आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कारवाई करण्याचा इशारा (Gram Panchayat)
याबाबत प्रशासनाने नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या व्यावसायिकांनाही प्रशासनाने नोटीसा बजावले आहेत. जर रस्त्यावर तसेच रस्त्याच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब सप्रे यांनी दिला आहे.


