Police Action : नगर : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींची धिंड काढली. न्यायालयाने सर्व आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नेमकं काय घडलं?
संशयितांनी पर्यटकांच्या मोटारीचा पाठलाग करताना काही दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर केला होता. यातील काही वाहने ताब्यात घेतली गेली असून उर्वरित वाहनांचा शोध सुरू आहे. भावली धरण परिसरात ही घटना घडली होती. नाशिकमधील कुटुंबिय फिरण्यासाठी तिथे गेले होते. तेव्हा एका तरुणाने महिलेची छेड काढली. त्याबद्दल जाब विचारल्यानंतर टोळक्याने कुटुंबाला धक्काबुक्की केली. यामुळे घाबरून हे कुटुंब आपल्या मोटारीतून नाशिककडे निघाले असता टोळक्याने मोटार आणि दुचाकींवरुन त्यांचा सुमारे १२ किलोमीटर पाठलाग करून मोटारीवर बेसबॉल स्टिक, सळई, दांडके, रॉडने मारून तोडफोड केली होती. थरारक पाठलाग व हल्ल्याच्या चित्रफिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
नक्की वाचा : वांगचूक यांच्या उपोषणावरून राजू शेट्टींनी सांगितली अण्णांच्या आंदोलनाची आठवण
या नऊ जणांना अटक (Police Action)
या घटनेमुळे सुरक्षित पर्यटनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न, दरोडा, विनयभंग आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांनी युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवत नऊ जणांना अटक केली. यात इगतपुरी तालुक्यातील विशाल भटाटे (२७, गिरणारे), अनिकेत मानवेढे (२४, गिरणारे), सागर उर्फ लोकेश गिते (२२, माणिक खांब), अनिरुद्ध भागडे (२५, नांदगाव सदो), विनोद बोराडे (२६, इगतपुरी गावठाण), अर्जुन आडोळे (२५, माणिक खांब), सचिन आडोळे (२९, माणिक खांब)आणि देविदास भगत (२५, बलायदुरी), अजय दालभगत (२०, देवळे घोटी) यांचा समावेश आहे.



