Appeal : नगर : कन्यादान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या वधू-वरांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यासाठी नोंदणीकृत सेवाभावी संस्था व यंत्रणांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी केले आहे. सन २०२६-२७ या वर्षात जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या जोडप्यांना २५ हजार रुपये, तर सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या नोंदणीकृत सेवाभावी संस्थांना प्रत्येक जोडप्यामागे २ हजार ५०० रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कागदपत्रे
प्रस्तावासोबत संस्थेचा नोंदणी दाखला, संस्थेच्या घटनेची प्रत, संचालक मंडळाची यादी तसेच अध्यक्ष व सचिव यांच्या आधार कार्डाच्या प्रती जोडाव्यात. संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी. संस्थेने कोणताही आर्थिक गैरव्यवहार केलेला नसल्याचे अथवा संस्थेविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे १०० रुपयांच्या मुद्रांक कागदावरील प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
नक्की वाचा : वांगचूक यांच्या उपोषणावरून राजू शेट्टींनी सांगितली अण्णांच्या आंदोलनाची आठवण
जाणून घ्या निकष (Appeal)
संस्थेने वर व वधूचे विवाह नोंदणी अर्ज शासन निर्णयानुसार आवश्यक कागदपत्रांसह प्रकल्प अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक राहील. प्रस्ताव अथवा लाभार्थ्यांची कागदपत्रे अपूर्ण असल्यास संस्थेची निवड रद्द करण्यात येईल व अनुदान देण्यात येणार नाही. सहभागी जोडप्यांना विवाहाच्या दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.



